IRCTC ने दिला स्प्लिट, शेअर घ्यावा की नको? तज्ञ काय म्हणतायत?

IRCTC approves 1:5 stock split to attract small investors. should you buy or sell?

आर्थिक वर्ष २०२१-२२ चे निकाल जाहीर करताना, IRCTC व्यवस्थापनाने IRCTC चे शेअर्स १:५ रेशोमध्ये स्प्लिट करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे १० रू इक्विटी शेअरची फेस व्हॅल्यू २ रु होईल. त्याचप्रमाणे, आयआरसीटीसीच्या स्टॉकची किंमत २६६० रू वरून सुमारे ५०० ते ५५० रु. पर्यंत खाली येईल. तज्ञांच्या मते, या विभाजनाचा IRCTC कंपनीच्या व्हॅल्यूएशनवर इतका परिणाम परिणाम होणार नाही परंतु छोट्या गुंतवणूकदारांना IRCTC च्या शेअर्समध्ये गुंतवणूक करणे सोपे होईल.

यावर एसएमसी ग्लोबल सिक्युरिटीजचे सौरभ जैन म्हणाले कि ,”हे विभाजन कंपनीच्या व्हॅल्यूएशनवर परिणाम करणार नाही. तसेच विद्यमान शेअरधारकांवरही याचा परिणाम होणार नाही. IRCTC च्या शेअरची किंमत देखीलकमी होईल.आता लहान गुंतवणूकदार देखील IRCTC मध्ये गुंतवणूक करू शकतील”.

या स्प्लिटचा IRCTC ला कसा फायदा होईल यावर बोलताना, जीसीएल सिक्युरिटीजचे उपाध्यक्ष रवी सिंघल म्हणाले, “एकदा छोटे गुंतवणूकदार IRCTC शेअर्समध्ये गुंतवणूक करू लागले,की स्टॉकमध्ये जास्तीचा व्हॉल्युम दिसेल. यामुळे लिक्विडीटी सुद्धा वाढेल.”

स्प्लिटनंतर IRCTC चे शेअर्स खरेदी करायचे की नाही? यावर रवी सिंघल म्हणाले, “IRCTC शेअर्समध्ये गुंतवणूक करणे आता छोट्या गुंतवणूकदारांना परवडणारे ठरेल. ४५० ते ४७० रु मध्ये खरेदी केलेला शेअर पुढील चार ते पाच वर्षांमध्ये स्टॉकची सध्याची २५०० रुपये किंमत गाठण्याची शक्यता आहे.”

Comments are closed.