काय चाललंय काय? आता आणखी एक आयपीओ

Travel booking platform Ixigo has filed its DRHP for a Rs 1,600 crore IPO

भारतीय शेअर बाजारात आयपीओची चलती असताना आता आणखी एक आयपीओ येऊ घातला आहे. ट्रॅव्हल बुकिंग ॲप ixigo प्रायमरी फंड द्वारे 750 कोटी आणि विद्यमान गुंतवणूकदारांकडून OFS द्वारे 850 कोटी रुपये गुंतवणूक करण्याचा विचार करत आहे. कंपनीने सेबीकडे फाईल केलेल्या डीआरएचपीमध्ये ही माहिती देण्यात आली आहे. एकूण 1,600 कोटी रुपयांची डीआरएचपी गुरुवारी संध्याकाळी दाखल करण्यात आली आहे.

सध्याचे गुंतवणूकदार मायक्रोमॅक्स आणि एलिव्हेशन कॅपिटल ओएफएस द्वारे बाहेर पडताना दिसतील. मेकमायट्रीप याआधीच कंपनीतून बाहेर पडले आहे. तसेच प्रमोटर, आलोक वाजपेयी आणि रजनीश कुमार हे देखील आयपीओद्वारे आपले समभाग विकण्याचा विचार करत आहेत.

मागील महिन्यात कंपनीने इन्फो एज व्हेंचर्स, व्हाईट ओक, बे कॅपिटल, ओरिओस व्हेंचर पार्टनर्स, ट्रायफेक्टा कॅपिटल आणि मलबार इन्व्हेस्टमेंट्ससारख्या गुंतवणूकदारांकडून 395 कोटी रुपये उभे केले आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कंपनीचे सध्याचे व्हॅल्यूएशन सुमारे 850 मिलियन डॉलर्स आहे आणि या वर्षाच्या अखेरीस त्यांचा आयपीओ येण्याची शक्यता आहे.

2007 मध्ये लॉन्च झालेल्या, ixigo चे 250 मिलियन हून अधिक वापरकर्ते आहेत.बेंगळुरू येथील ऑनलाइन ट्रेन डिस्कव्हरी आणि बुकिंग प्लॅटफॉर्म कन्फर्मतिकीत देखील त्यांनी विकत घेतले आहेत.

आयसीआयसीआय सिक्युरिटीज, ॲक्सिस कॅपिटल, कोटक महिंद्रा कॅपिटल आणि नोमुरा या इन्व्हेस्टमेंट बँक इश्यू बुक मॅनेजर आहेत तर शार्दुल अमरचंद मंगलदास आणि खेतान अँड कंपनीसारख्या कंपन्या कायदेशीर बाबींवर कंपनीला सल्ला देत आहेत.

Comments are closed.