टाटांचा नादच नाही! मेडल हुकलेल्या खेळाडूंना देणार ‘सोनेरी’ रंगांची गाडी

Tata Motors announced that the company will gift an Altroz to each of the Indian athletes who missed the bronze medal at the Tokyo Olympics.

नुकतेच पार पडलेले टोकियो ऑलिंपिक भारतातही आजवरचे सर्वात चांगले ऑलंपिक ठरले. भारताने एकूण सात पदके कमावली. नीरज चोप्राने भालाफेकीत सुवर्णपदक मिळवत भारताच्या ऑलिंपिक मोहिमेवर सुवर्णमोहोर लावली. मात्र असे काही खेळाडू होते की जे पदकाच्या अगदी नजीक जाऊनही पदक जिंकू शकले नाहीत. पदकपासून किंचित दूर राहिलेल्या या खेळाडूंसाठी टाटा मोटर्सने काल मोठी घोषणा केली. या भारतीय खेळाडूंना टाटा मोटर्स आपली प्रीमियम हॅचबॅक गाडी अल्ट्रोझ भेट करणार आहेत.

या खेळाडूंनी ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करताना, एक उच्च स्टँडर्ड निश्चित केले आणि अनेक युवा खेळाडूंना प्रेरित केले. त्यांच्या अथक परिश्रम आणि समर्पणाबद्दल कंपनी लवकरच या सगळ्यांना हाय स्ट्रीट गोल्ड कलरमधील प्रीमियम हॅचबॅक गाडी,अल्ट्रोझ त्यांना भेट करणार आहे. असे कंपनीकडून स्पष्ट करण्यात आले.

टाटा मोटर्सचे अध्यक्ष शैलेश चंद्रा यांनी बोलताना सांगितले की, “भारतासाठी हे ऑलिम्पिक निराळं ठरले. हे ऑलिंपिक भारतासाठी पदके आणि पोडियम फिनिश यापेक्षा बरंच काही होतं. जगातील सर्वोत्तम खेळाडूंच्या विरोधात त्यांनी सर्वोच्च कामगिरी केली,आणि पदकाच्या अगदी जवळ पोहचले. जरी त्यांना पदक मिळवण्यासाठी अपयश आले तरी त्यांनी लाखो भारतीयांची मने जिंकली आहेत आणि ते भारतातील नवोदित खेळाडूंसाठी एक प्रेरणा आहेत.”

“टाटा अल्ट्रोजने सेफ्टी ,डिझाईन आणि परफाॅरमन्समधे नवीन बेंचमार्क सेट केले आहेत. या खेळाडूंना ही गाडी भेट देणे ही कंपनीसाठी भाग्याची गोष्ट आहे.” असेही त्यांनी नमूद केले.

गोल्फर आदिती अशोक टोकियो ऑलिम्पिकमध्ये चौथे स्थान पटकावून पदकापासून वंचित राहिली. त्याचप्रमाणे, भारतीय महिला हॉकी संघ आणि कुस्तीपटू दीपक पुनिया यांनाही अत्यंत जवळून पदक गमवावे लागले. टाटा मोटर्सतर्फे या खेळाडूंना अल्ट्रोज भेट देण्यात येईल.

Comments are closed.