घर घेताय तर हे नक्की वाचा! “ह्या” बँकेने कमी केले होम लोनवरील व्याजदर

Kotak Mahindra Bank reduced interest rates on home loans. This special rate is a limited period festive season offer beginning 10th September and ending 8th November 2021.

कोटक महिंद्रा बँकेने ९ सप्टेंबर रोजी जाहीर केले की ते १० सप्टेंबरपासून होमलोनचे दर १५ बेस पॉइंटने कमी करणार आहेत. कोटक महिंद्रा बँक लिमिटेड (केएमबीएल) आता ६.६५ टक्के व्याजदराऐवजी ६.५० टक्के व्याजदराने होमलोन देईल.

फक्त सणासुदीसाठी ही ऑफर आहे. ८ नोव्हेंबर २०२१ पर्यंत ही ऑफर असेल. शिवाय ६.५ टक्के कमी केलेला व्याज दर सर्व कर्जाच्या रकमेवर लागू होईल आणि कर्जदाराच्या क्रेडिट प्रोफाइलशी जोडला जाईल. याव्यतिरिक्त हे फ्रेश आणि बॅलन्स ट्रान्सफर ह्या दोन्ही केसेसवर लागू होईल.

कोटक महिंद्रा बँकेचे कन्स्युमर ॲसेटचे अध्यक्ष अंबुज चंदना म्हणाले, “लाखो घर खरेदीदारांसाठी घराचे स्वप्न साकार करण्याकरिता आम्ही मदत करू याचा आम्हाला आनंद होत आहे. जसे जग झपाट्याने बदलले आहे आणि आपण घरी अधिक वेळ घालवत आहोत आपली जीवनशैली देखील विकसित झाली आहे. यासाठी लोक आरामदायी रेसिडेन्सी शोधत आहेत जिथे संपूर्ण कुटुंब आनंदाने राहू शकते. यामुळे कोटकचा ६.५० टक्के व्याजदर आता स्वप्नातील घर अधिक परवडणारे बनवतो”.

जुलै महिन्यातील Bankbazaar.com च्या आकडेवारीनुसार कोटक महिंद्रा स्वस्त दरात होम लोन देणाऱ्या बँकांमध्ये आधीपासूनच आघाडीवर होती.

कमीतकमी १६ बँका आणि हाऊसिंग फायनान्स कंपन्या सात टक्क्यांखाली व्याजदराने ७५ लाख रुपयांचे होमलोन देतात . त्यापैकी, खाजगी क्षेत्रातील बँक कोटक महिंद्रा आणि सरकारच्या मालकीची पंजाब आणि सिंध सर्वात स्वस्त गृहकर्ज देतात, ज्यांचे व्याज दर ६.६५ टक्क्यांपासून सुरू होतात. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) आणि HDFC सारखे मोठे कर्जदार अनुक्रमे ६.९५ टक्के आणि सात टक्के व्याज दराने ७५ लाख रुपयांचे होमलोन देतात.

Comments are closed.