क्रेडिट कार्ड मिळायला येतेय अडचण? ही कंपनी देऊ शकते तुम्हाला क्रेडिट कार्ड

KreditBee, one of India’s leading digital lending platforms, today entered into the card segment with the launch of ‘KreditBee Card’.

भारतात कर्ज ऑफर करणारे अनेक डिजिटल प्लॅटफॉर्म आहेत, यात क्रेडीटबी कंपनीचा ही समावेश होतो,क्रेडीटबी कंपनीने नुकतेच ‘क्रेडीटबी कार्ड’ लॉन्च केले आहे. बँकिंग ग्राहकांना हे क्रेडिट प्रदान करण्याचा विचार कंपनी करत आहे. कंपनीने या उत्पादनाच्या विकासासाठी रुपे आणि आरबीएल बँकेसोबत भागीदारी केली आहे. जानेवारी २०१९ ते जानेवारी २०२१ दरम्यान ब्युरो इंक्वायरी डेटा एकत्रित केला गेला आहे, ज्यातून हे निष्कर्षास आले की नवीन-क्रेडिट (एनटीसी) ग्राहकांपैकी १६ टक्के क्रेडिटबी कार्डसाठी अर्ज करू इच्छितात.

क्रेडिटबी कार्ड काय ऑफर करते?

कंपनी ग्राहकांबाबत, त्यांच्या रोजगाराचा तपशील, मागील परतफेडीचा इतिहास, कर्जदाराच्या वर्तनाचा महत्त्वपूर्ण संकेत पुरवणारी सोशल मीडिया ॲक्टिविटी इत्यादींचे मूल्यांकन करून क्रेडिटबे व्हर्च्युअल क्रेडिट कार्ड जारी करते. क्रेडिटबी ॲपद्वारे कार्डसाठी अर्ज केला जाऊ शकतो आणि यातून कार्ड चा तपशील पाहिला जाऊ शकतो.

सुरुवातीला, एनटीसी ग्राहक १०,००० रुपयांपर्यंत क्रेडिट रक्कम घेऊ शकतात. ग्राहकांच्या पूर्ण केवायसीच्या आधारे ही रक्कम वाढवली जाते. याद्वारे तुम्ही तुमच्या बँक खात्यात रोख रक्कम ट्रास्फर करू शकता किंवा क्रेडिट कार्डद्वारे ऑनलाईन कुठेही खरेदी करू शकता. क्रेडिटवर वापरलेली रक्कम ४५ दिवसांच्या आत बिलिंग सायकलमध्ये भरली पाहिजे. कार्ड चालू झाल्यावर ९९ रुपयांचे वन टाईम शुल्क आकारले जाते. दुसऱ्या वर्षापासून तेच १४९ रूपये इतके आकारले जाते.

काय काम करते?

ऑनलाईन खरेदी करताना तुम्ही इतर कोणत्याही बँक क्रेडिट कार्ड प्रमाणे क्रेडिटबी कार्ड वापरू शकता. तुम्ही तुमच्या बँक खात्यात ती रक्कम ट्रान्स्फर करू शकता किंवा उपलब्ध मर्यादेपर्यंत कार्ड ऑनलाइन वापरू शकता. कोणतीही खरेदी उपलब्ध मर्यादेपेक्षा जास्त असेल तर ती नाकारली जाते. आपण क्रेडिट मर्यादा ओलांडू नये.

काय करत नाही ?

कार्डवर अनेक अतिरिक्त शुल्क आकारले जाते उदाहरणार्थ, जर तुम्ही बँक खात्यात रक्कम क्रेडिट मर्यादेमधून ट्रान्स्फर केली, तर त्या रकमेवर ५-७ टक्के एकूण पैसे आकारले जातात .

डिफॉल्ट झाल्यास, रकमेच्या ३ टक्के बाउंस शुल्क (दोनपैकी जास्तीत जास्त) ग्राहकाकडून आकारले जाते. जमा करायच्या रकमेत कोणताही विलंब (४५ दिवसांच्या क्रेडिट सायकलच्या पलीकडे) झाल्यास रकमेवर प्रतिदिन ०.१५ टक्के विलंब शुल्क आकारले जाते, विलंब शुल्काव्यतिरिक्त, व्याज शुल्क २०-२९.९ टक्क्या दरम्यान असते.

क्रेडिटसाठी नवीन आहात का? कार्ड सुज्ञपणे वापरा

एक नवीन कर्जदार म्हणून,कर्जदार तुमच्या लाईफस्टाईल वरील अनेक पैलूंची छाननी करतील जेणेकरून कार्ड इश्यू करण्यापूर्वी तुम्हाला अधिक चांगल्या प्रकारे ओळखता येईल. यामुळे थकबाकीवर कसलाही डिफॉल्ट करू नका.

Myloancare.in चे संस्थापक गौरव गुप्ता म्हणतात, “क्रेडिट कार्ड असणे हा एक चांगला क्रेडिट प्रोफाइल बनवण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे.

KreditBee चे क्रेडिट कार्ड नवीन क्रेडिट ग्राहकांना दिले जाते. तथापि, कसलाही क्रेडिट संबंधीत इतिहास नसतानाही क्रेडिट कार्ड घेण्याचा एक चांगला मार्ग म्हणजे सुरक्षित क्रेडिट कार्ड घेणे. स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, कोटक महिंद्रा बँक आणि ॲक्सिस बँक इतरांना फिक्स्ड डिपॉझिट्सच्या मध्ये सुरक्षित क्रेडिट कार्ड ऑफर करतात. या बँका सुरक्षित क्रेडिट कार्ड इश्यू करतात जर तुम्ही त्यांच्या मुदत ठेवींमध्ये गुंतवणूक केली असेल.

तुम्ही तुमची रक्कम भरण्यास उशीर केल्यास, बँक तुमच्या थकबाकीच्या मर्यादेपर्यंत फक्त तुमची FD, किंवा त्याचा काही भाग काढून टाकते आणि पैसे वसूल करते. तसेच, काही बँका रेगुलर क्रेडिट कार्डच्या तुलनेत सुरक्षित कार्डांवर कमी व्याज आकारतात.

Comments are closed.