एलआयसी पॉलिसी लॅप्स झालीये? काळजीचे कारण नाही. आता करू शकता पॉलिसी रिव्हाइव्ह

The Life Insurance Corporation of India (LIC) has launched a special two-month campaign to revive individual lapsed policies

२३ ऑगस्ट रोजी भारतीय आयुर्विमा महामंडळ (एलआयसी) ने डबघाईला आलेल्या पॉलिसीचे पुनर्जीवन करण्यासाठी दोन महिन्यांची विशेष मोहीम सुरू केली आहे.

‘स्पेशल रिवायवल कॅम्पेन’ हा कार्यक्रम २३ ऑगस्टपासून सुरू करण्यात आला आहे जो २२ ऑक्टोबर २०२१ पर्यंत चालू राहील. या दरम्यान LIC लेट फी वर सुद्धा सवलत देणार आहे.

ही मोहीम कशी कार्य करते?

एलआयसीने एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की,काही विशिष्ट पात्र योजना पहिल्या अनपेड प्रीमियमच्या तारखेपासून पाच वर्षांच्या आत पुनर्जीवित केल्या जातील.

प्रीमियम भरण्याच्या मुदतीत विलंबित अवस्थेत असलेल्या आणि अपूर्ण असलेल्या पॉलिसी टर्म या मोहिमेत रिवायव्ह होण्यास पात्र आहेत, परंतु टर्म इन्शुरन्स आणि हाय रिस्क योजना यातून वगळण्यात आल्या आहेत.

सध्याची परिस्थिती पाहता, टर्म इन्शुरन्स आणि हाय-रिस्क प्लॅन व्यतिरिक्त लेट फी मध्ये सवलत दिली जात आहे, जी एकूण प्रीमियम मध्ये भरली जाते.पात्र असणाऱ्या हेल्थ आणि मायक्रो इन्शुरन्स प्लॅन वर देखिल सवलत उपलब्ध आहे.

१ लाख रुपयांपर्यंतच्या एकूण प्रीमियमसाठी, लेट फीमध्ये २० टक्के सवलत दिली जाईल. तथापि, सवलतीची रक्कम २,००० रुपयांपेक्षा जास्त नसेल.

१ लाखांपासून ३ लाखापर्यंत एकूण प्रीमियमसाठी, लेट फीमध्ये २५ टक्के सवलत देण्यात येईल. जी २,५०० रू पेक्षा जास्त नसेल.

एकूण प्रीमियम जर ३ लाख रुपयांपेक्षा जास्त असल्यास, लेट फीमध्ये ३० टक्के सवलत मिळेल,परंतु सवलतीची रक्कम ३,००० रुपयांपेक्षा जास्त नसेल.

ही मोहीम अशा पॉलिसीधारकांच्या फायद्यासाठी सुरू करण्यात आली आहे ज्यांची पॉलिसी अपरिहार्य परिस्थितीमुळे वेळेवर प्रीमियम भरण्यास सक्षम नसल्यामुळे पूर्ण होऊ शकली नाही.

Comments are closed.