फक्त वडापाव विकून १०० कोटींची कंपनी बनविणाऱ्या माणसाची गोष्ट

How Dheeraj Gupta built Jumbo King

वडापाव आणि महाराष्ट्र एक प्रकारचं विधीलिखत नातच म्हणावे लागेल. एकतर खिशाला परवडणारा आणि चुटकीसरशी जीभ चमचमीत करून भूक भागविणारा हा वडापाव. अर्थात नुसतं नाव ऐकलं तरी तोंडाला पाणी आलंच असेल. येणंही साहजिक, आपण महाराष्ट्रीयन आहोतच वडापाव च्या खूप जवळचे.आणि जर वडापावसोबत तळलेली मिरची, चटणी आणि सॉस असेल तर विचारूच नका.

बर हे झालं पोटासंबधित, पण आता आपण पाहूया पोटापाण्यासंबंधी म्हणजेच याच वडापाव वर यशाची शिखरे गाठणाऱ्या तरुणाविषयी,

तर तो तरुण आहे धीरज गुप्ता ज्याने वडापाव चा ब्रँड तयार करून त्याला भारतभर पोहचवले. त्यांनी मॅकडोनाल्ड्स, डोमिनोज आणि पिझ्झा हट येथील खाद्यपदार्थांच्या बरोबरीने वडापाव हा ब्रँड वाढवला. २ लाख रुपयांची गुंतवणूक करून धीरजने जंबोकिंग बर्गर सुरू केले, जे १०० कोटी पर्यंत वाढले आहे.

१९९८, मध्ये धीरजने आपला बिस्नेस मॅनेजमेट चा अभ्यासक्रम पूर्ण केला होता आणि त्यावेळी मॅकडोनाल्ड आणि डॉमिनोस यांनी भारतात प्रवेश करून फक्त दोन वर्षे झाली होती. धीरज म्हणतात,” तेव्हा मला खात्री होती की भारतात मिठाई,चॉकलेट सारखे पॅक केलेले पदार्थ यात काम करण्याची चांगली संधी आहे. पण ही कल्पना कल्पनाच राहिली.

व्यवसायाची ही कल्पना सोडून देण्यापूर्वी दोन वर्षांत त्यांना तब्बल ५० लाख रुपयांचे नुकसान झाले. “मी अनेकाकडून पैसे घेतले होते आणि व्यवसायात यशस्वी होण्याचा प्रयत्न करत होतो. यासाठी मी अनेक कल्पनांचा शोध घेत होतो. सोबतच मी मॅक्डोनल्ड्स आणि डोमिनोजच्या यशाकडे देखील दुर्लक्ष करू शकत नव्हतो. अखेर मी मिठाई व्यवसायाच्या कल्पनेला निरोप दिला आणि क्विक सर्व्हिस रेस्टॉरंट (क्यूएसआर) व्यवसाय उभारण्यावर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला.”

मॅकडोनाल्डच्या बर्गरच्या लोकप्रियतेमुळे प्रेरित होऊन धीरजने वडापावला निवडले. २००१ मध्ये, त्यांनी दोन लाख रुपयांचे कर्ज घेतले आणि जंबोकिंग सुरू करण्यासाठी मालाड रेल्वे स्थानकाबाहेर १०० ते २०० चौरस फूट जागा भाड्याने घेतली आणि स्वच्छ आणि नव्याने बनवलेल्या वडा पाव विक्रीला सुरवात केली. बाजारात मिळत असलेल्या वडा पावच्या तुलनेत हा जंबो वडा पाव आकाराने २० टक्के मोठा होता.

“ सुरुवातीच्या यशाने मला आत्मविश्वास दिला. जंबोकिंगच्या लोकप्रियतेत वाढ झाली हे पाहून, प्रतिस्पर्धींनी ‘जंबो वडा पाव’ असे म्हणत आमच्या मॉडेलची काॅपी काढली. परंतु आमच्या आउटलेट्सच्या वाढत्या संख्येमुळे ग्राहकांना ओरिजनल ओळखणे सहज शक्य झाले.”

धीरज म्हणतात की आउटलेट्स उघडल्याने त्यांना क्विक रेस्टॉरंटच्या कामकाजाची माहिती मिळाली. “मी ब्रँड विकसित करत असताना, जागतिक क्यूएसआर ब्रँड पोझिशनिंग आणि मार्केटींगद्वारे यशस्वी कसे होतात, ग्राहकांना खेचण्यासाठी त्यांची रणनिती कशी तयार केली जाते आणि एकाच उत्पादनावर भर देऊन मोठ्या प्रमाणात अर्थव्यवस्था निर्माण करण्यावर जोरदार लक्ष केंद्रित करण्यामागील कारणे शोधाण्यास मी सुरवात केली. आम्ही ब्रेड आणि बटाटे यांचे प्रमाण वाढवत असताना आमच्या फ्रँचायझीच्या संख्येत देखील वाढ झाली होती. आमचे पहिले दोन उत्पादने सेझवान जंबोकिंग आणि छोले जंबोकिंग होते. ”

“ग्लोबल क्यूएसआर जायंट्सच्या बिझिनेस मॉडेल्सचे निरीक्षण करून जंबोकिंग तयार केले गेले आहे. माझे संशोधन आणि अनुभव यामुळे सगळ्या प्रक्रियेस मदत झाली. अल राईज आणि जॅक ट्राउट यांची तसेच द बॅटल फॉर युअर माइंड’ ही पुस्तके वाचण्यासाठी मी नवोदित उद्योजकांना प्रोत्साहित करेन , कारण माझ्या प्रवासात या गोष्टींनी मला मदत केली आहे. ”

सबवे फ्रँचायझी मॉडेल स्विकारत जगभरात ७८,००० स्टोअर्स त्यांनी तयार केले. धीरजने मुंबईत लवकर यश प्राप्त केले असले तरी देशातील इतर भागात त्यांना आव्हानांचा सामना करावा लागला.

“प्रत्येक नवीन उपक्रमात अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो; आमचा व्यवसाय २०१० नंतर वाढला तेही तब्बल १० वर्षांच्या अथक परिश्रमानंतर. सुरुवातीच्या गुंतवणूकीमुळे आम्हाला ३२ स्टोअर वाढवण्यास मदत झाली. २००७ मध्ये आम्ही ५.५ कोटी रुपयांचे लक्ष ठेवले होते आणि यातून आमचे २००८ साली ४५ आऊटलेट्स तयार झाले. ”

सध्या, जंबोकिंगमध्ये वडा पाव आणि बर्गरचे अनेक प्रकार उपलब्ध आहेत, यात टँगी मेक्सिकन, कॉर्न पालक, नाचोस, चीज ग्रील्ड, बिग क्रंच, तंदुरी पनीर आणि क्रिस्पी वेज आणि अलीकडेच सादर केलेला मॅक आणि चीज बर्गर. त्यासह रॅप्स, मिल्क शेक, आईस्क्रीम आणि फ्राईज देखील येथे मिळतात. ११४ फ्रँचाइजीसह मुंबई, पुणे, इंदूर आणि लखनऊसह इतर शहरांमध्ये स्टोअर उपलब्ध आहेत. धीरजने मार्च २०२२ पर्यंत देशभरात १८० आउटलेट्स तयार करण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे.

भारतीय बर्गरमध्ये आरोग्यदायी पर्याय सादर करण्याबाबत विचारले असता ते म्हणतात, “आम्ही ब्राऊन ब्रेडची ओळख करून दिली, पण ती पाहिजे इतकी जमली नाही ”

धीरजने उद्योजकांना सल्ला देताना असं म्हटल आहे की त्यांनी त्यांच्या व्यवसायाकडे लक्ष दिले पाहिजे आणि शिस्तबद्ध दृष्टिकोन बाळगला पाहिजे. पर्यायांचा विचार करण्यापेक्षा त्यांनी उपलब्ध गोष्टीवर काम केले पाहिजे. यासाठी धैर्याची आवश्यकता आहे, आणि एकंदरीत प्रयत्नामुळे तुम्ही मार्केट मध्ये दीर्घकाळ टिकून राहण्यास मदत होईल.

Comments are closed.