आयपीओमध्ये गुंतवणुकीबद्दल सारे काही

What should you focus on while investing in IPO?

सध्या भारतात मान्सूनमधील पावसासोबतच आयपीओंचासुद्धा पाऊस पडत आहे. गेल्या सात महिन्यांत भारतीय शेअर बाजारात तब्बल ४० आयपीओ आले. याआधी २०२० मध्ये ३३ आणि २०१९ मध्ये ४९ आयपीओ आले होते. कोविड महामारीचा परिणाम असूनही, या वर्षी देशात आयपीओच्या संख्येचा विक्रम होईल असे चित्र सध्यातरी आहे.

 

आयपीओमध्ये गुंतवणूक करून लिस्टिंग गेन्स मिळवणे या हेतूने अनेकजण त्यात सहभागी होत असतात. मात्र ही गुंतवणूक करताना काय लक्षात ठेवले पाहिजे हे जाणून घेऊयात.

 

आयपीओ म्हणजे काय?
जेव्हा एखादी कंपनी पहिल्यांदाच सामान्य नागरिकांना आपल्या शेअर्सची विक्री करते तेव्हा त्या प्रक्रियेला आयपीओ असे म्हटले जाते. आयपीओच्याआधी कंपनी ही प्रायव्हेट कंपनी असते. मर्यादित शेअरहोल्डर्सची कंपनीवर मालकी असते. तथापि, आयपीओनंतर, तुमच्याआमच्यासारखे लोक शेअर्स घेतात आणि शेअर्सची संख्या अनेक पटीने वाढते. आयपीओ आल्यावर कंपनी स्टॉक एक्सचेंजवर लिस्ट होते. आयपीओमुळे कंपनीच्या मालकांना आणि सुरुवातीच्या गुंतवणूकदारांना ऑफर फॉर सेलद्वारे कंपनीतून बाहेर पडण्याचा पर्यायदेखील मिळतो.

 

आयपीओसाठी अर्ज कसा करावा?
गुंतवणूकदार म्हणून, तुम्ही तुमच्या बँकेद्वारे किंवा ब्रोकरद्वारे आयपीओसाठी अर्ज करू शकता. अर्जाचे पैसे गोळा करण्यासाठी, बँकांकडे ॲप्लिकेशन सपोर्टेड बाय ब्लॉक्ड अमाऊंट (एएसबीए) सुविधा उपलब्ध आहे. तर काही ब्रोकर यूपीआयद्वारे आयपीओ गुंतवणूकीची प्रक्रिया करतात. या दोन्ही प्रक्रियांमध्ये, शेअर्सची अलॉटमेंट होईपर्यंत तुमच्या अकाऊंटमधील पैसे ब्लॉक केले जातात. तुमचा अर्ज नाकारल्यास तुम्हाला पैसे रिफंड केले जातात. एखादा आयपीओ एकतर ओव्हर सबस्क्राईब किंवा अंडर सबस्क्राईब होऊ शकतो. ओव्हर सबस्क्राईब झाल्यास अलॉटमेंट मिळण्याची शक्यता कमी असते.

 

आयपीओ गुंतवणुकीचे धोके काय आहेत?
गेल्या वर्षांपासून अनेक कंपन्यांनी निधी उभारण्यासाठी आयपीओची निवड केली आहे. कोविड -19 चा व्यवसायावर झालेला परिणाम हे याचे मुख्य कारण आहे. याबरोबरच नव्या गुंतवणूकदारांचा स्टॉक मार्केटमध्ये वाढलेला सहभाग हेही एक कारण आहे. या गुतंवणूकदारांना लिस्टिंग गेन्सची अपेक्षा असते जे ४०-६०% दरम्यान असू शकतात. हे गुंतवणूकदार लिस्टिंगच्या दिवशी आपले शेअर्स विकून झटपट फायदा कमावण्याच्या प्रयत्नांत असतात. परंतू याकडेही लक्ष दिले पाहिजे गेल्या दशकभरात जवळपास ७०% आयपीओजमधून लिस्टिंग गेन्स मिळालेले नाहीत. यासाठी आयपीओला अप्लाय करण्याआधी कंपनीचा अभ्यास करणे तितकेच गरजेचे आहे.

 

आयपीओचे विश्लेषण कसे करावे?
बर्‍याच डेटासह कंपनीचे विश्लेषण करणे आव्हानात्मक असते. त्यातही जेव्हा कंपनी आयपीओ आणते तेव्हा तर ते आणखीच आव्हानात्मक बनते. यासाठी आपल्याला आरएचपी फायदेशीर ठरतो. याद्वारे आपण प्रमोटरच्या नावांपासून, त्यांना किती रक्कम उभारायची आहे, नव्या इश्युबद्दलची माहिती आणि ऑफर फॉर सेल यांची सर्व माहिती मिळवू शकतो.

 

एक गुंतवणूकदार म्हणून,आपण ऑफरकडे लक्ष देणे आवश्यक आहे. कंपनी निधीचा वापर कसा करणार आहे याकडे लक्ष दिले पाहिजे. ऑफर फॉर सेल ही ऑरगॅनिक ग्रोथसाठी असू शकते किंवा कर्ज कमी करण्यासाठी देखील असू शकते. यावर तुम्ही कंपनीचे मूल्यांकन करा आणि कंपनीचे बिसनेस मॉडेल आणि पार्श्वभूमी तसेच गेल्या तीन वर्षांपासून उपलब्ध आर्थिक आकडेवारी याचा विचार करा. याव्यतिरिक्त, आपण कंपनीचे कॅपिटल स्ट्रक्चर, काही कायदेशीर मुद्दे आणि व्हॅल्युएशन यावरसुद्धा लक्ष दिले पाहिजे.

 

कंपनी एकंदरीत,तुमच्या गुंतवणूकीची उद्दिष्टे आणि आर्थिक उद्दिष्टे पाहता पोर्टफोलिओमध्ये योग्य फिट होते किंवा नाही? याचे काळजीपूर्वक मूल्यांकन केले पाहिजे. गुंतवणूक करण्यापूर्वी नेहमी योग्य तो अभ्यास करून मगच निर्णय घेतला पाहिजे.

Comments are closed.