‘हा’ IPO लवकरच येणार, मार्केटमध्ये धुमाकूळ घालण्याची शक्यता

गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभागाचे सचिव तुहिन कांता पांडे यांनी काल सांगितले की,बहुप्रतिक्षित LIC IPO चालू आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत बाजारात येण्याची अपेक्षा आहे.

IPO च्या प्रचंड स्पर्धेत बरेच IPO मार्केटमध्ये येत आहेत. आता यात लवकरच सरकारी मालकीचा LIC IPO सामिल होण्याची चिन्हे दिसत आहेत.

गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभागाचे सचिव तुहिन कांता पांडे यांनी काल सांगितले की, बहुप्रतिक्षित LIC IPO चालू आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत बाजारात येण्याची अपेक्षा आहे.

सरकार 10% पर्यंत हिस्सा विकून 10 ट्रिलियन रुपये उभे करण्याचा प्रयत्न करत आहे. 5% स्टेक विकल्याने LIC भारतातील सर्वात मोठा IPO बनेल, तर 10% स्टेक केल्याने तो जागतिक पातळीवर विमा कंपनीमध्ये दुस-या क्रमांकाचा सर्वात मोठा IPO बनेल.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गेल्या महिन्यात ब्लूमबर्गला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते की, “आम्ही IPO चे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जोर देत आहोत. अर्थमंत्र्यांनी फेब्रुवारी 2020 मध्ये सदर विमा कंपनीचे शेअर्स विकण्याची योजना जाहीर केली होती, परंतु कोविडच्या उद्रेकाने ही प्रक्रिया मंदावली.

DIPAM सचिव पांडे म्हणाले, 5-6 सरकारी मालकीच्या कंपन्यांचे खाजगीकरण करण्याचे भारत सरकारचे उद्दिष्ट आहे.

Comments are closed.