असा असेल मारूती सुझुकीचा नविन प्लॅन,‘ इतके ‘ कोटी गुंतवण्याची तयारी

Maruti plans new plant after 15 years; sets aside Rs 2,200 cr for FY22 capex

भारतातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकीने ,FY22 साठी आपला भांडवली खर्च (capex) 6,700 कोटी रुपयांपर्यंत वाढवला आहे तसेच कंपनीने नवीन उत्पादन प्रकल्प उभारण्याची योजना आखली आहे.

मारुती सुझुकीने आपल्या 15 वर्षांहून अधिक काळात नवीन क्षमता निर्मितीमध्ये गुंतवणूक करण्याची ही पहिलीच वेळ असेल. शेवटच्या वेळी कंपनीने 2007 मध्ये हरियाणातील मानेसर येथे नवीन प्लांट उभारला होता.

स्विफ्ट, बलेनो आणि डिझायरचे उत्पादन करणारे गुजरात प्लांट हे मारूती सुझुकीच्या मालकीचे आहे.

एकंदरीत 2,200 कोटी गुंतवणुकीची योजना ही कंपनीच्या 10 वर्षांच्या 17,000-18,000 कोटी गुंतवणूक करण्याच्या योजनेचा एक भाग आहे, ज्यामध्ये प्रतिवर्षी 1 मिलियन युनिट्सची क्षमता निर्माण करण्याचा मानस आहे. हा नवीन प्लांट हरियाणामध्ये उभारला जाईल.

कंपनीने हे सूचित केले नाही की, नवीन प्लांट मध्ये इंजिन पेट्रोल, डिझेल आणि सीएनजीद्वारे समर्थित मॉडेल तयार केले जाईल किंवा ते इलेक्ट्रिक वाहनांचे (EV) उत्पादन केले जाईल. 27 ऑक्टोबर रोजी, मारुती सुझुकीचे अध्यक्ष आर.सी भार्गव यांनी सांगितले होते की, कंपनीची ईव्ही लॉन्च करण्याची कोणतीही योजना नाही.

कंपनीचा 300 एकरांवर पसरलेला गुडगाव प्लांटही सर्वात जुना आहे आणि तेथे गर्दी कमी करणे आवश्यक आहे. मारुतीला हे त्वरीत करायचे होते, परंतु हरियाणा सरकारच्या नोकरी आरक्षण धोरणामुळे आणि कोविडमुळे, त्यांच्या योजना संथ मार्गावर होत्या.

हरियाणा राज्य स्थानिक उमेदवार रोजगार कायदा, 2020 नुसार हरियाणा सरकारने तेथील कंपण्याना, स्थानिक उमेदवारांना 75 टक्के रोजगार प्रदान करणे आवश्यक केले आहे.

कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (CII) ने या कायद्याविरुद्ध आश्चर्य व्यक्त केले होते आणि मनोहर लाल खट्टर यांच्या नेतृत्वाखालील सरकारला राज्यातील भविष्यातील गुंतवणुकीवर होणा-या प्रतिकूल परिणामाबद्दल सावध केले होते.

मारुती सुझुकीचे मुख्य वित्तीय अधिकारी अजय सेठ म्हणाले, “आम्ही 4,500 कोटी रुपयांचे कॅपेक्स ठेवण्याची योजना आखली होती. आम्ही FY22 साठी 2,200 कोटी रुपयांची अतिरिक्त रक्कम ठेवली आहे, जी आम्ही विचार करत असलेल्या इतर कोणत्याही विस्तारासाठी असू शकते. एकूण 6,700 कोटी रुपयांची भांडवली गुंतवणूक होण्याची शक्यता आहे. पहिल्या सहामाहीत केवळ रु. 1,500 कोटी खर्च झाले आहेत.

गुडगाव प्लांटची सध्याची कमाल क्षमता वर्षाला 700,000 युनिट्स आहे. 800,000 युनिट्सची उत्पादन क्षमता असलेल्या मानेसर प्लांटसह, मारुती सुझुकीची एकूण उत्पादन क्षमता वर्षाला 1.5-1.55 मिलियन युनिट्स इतकी आहे. SMG च्या मालकीच्या गुजरात प्लांटची उत्पादन क्षमता वर्षाला 750,000 युनिट्सची आहे.

सध्या ऑटोमेकर्स भारतातील दीर्घकालीन मागणीच्या शक्यतांबद्दल उत्साही दिसत आहेत. कोविडपूर्वी, सुझुकी मोटर कॉर्पोरेशनने 2030 पर्यंत मारुती सुझुकीकडून 5 मिलियन युनिट्सची वार्षिक विक्री करण्याचे उद्दिष्ट ठेवले होते.

हे लक्ष्य भारतातील बाजारातील 45-50 टक्के हिस्सा व्यापण्याच्या अनुषंगाने होते. भारतातील प्रवासी वाहनांची बाजारपेठ 2030 पर्यंत 10 मिलियन युनिट्सपर्यंत वाढेल, जी FY21 मध्ये 2.7 मिलियन युनिट्स होती.

Comments are closed.