‘ही’ मेटल रिसायकलिंग कंपनी आणतेय IPO, लागा तयारीला

Metal recycling firm CMR Green Tech files IPO paperwork with SEBI

मेटल रिसायकलिंग कंपनी CMR ग्रीन टेक्नॉलॉजीजने, IPO द्वारे फंड उभारण्यासाठी सेबीकडे कागदपत्रे दाखल केली आहेत.

DRHP नुसार, IPO मध्ये 300 कोटी रुपयांचे इक्विटी शेअर्स असतील, तर प्रमोटर आणि गुंतवणूकदारांकडून 3,34,14,138 इक्विटी शेअर्सच्या विक्रीची ऑफर उपलब्ध असेल.

OFS मध्ये शेअर्स ऑफर करणाऱ्यांमध्ये, गौरी शंकर अग्रवाल (34.33 लाख इक्विटी शेअर्स), कलावती अग्रवाल (33.45 लाख इक्विटी शेअर्स) आणि मोहन अग्रवाल व प्रतिभा अग्रवाल प्रत्येकी 30.09 लाख इक्विटी शेअर्स आणि गुंतवणूकदार ग्लोबल स्क्रॅप प्रोसेसर 1.99 कोटी इक्विटी शेअर्सची विक्री करतील.

कंपनी 60 कोटी रुपयांपर्यंत प्री IPO चा विचार करू शकते. जर असे झाल्यास, फ्रेश इश्यू साइझ कमी होऊ शकते.

फ्रेश इश्यूमधून मिळालेली रक्कम कर्जाची भरपाई आणि जनरल कॉर्पोरेट हेतूंसाठी वापरली जाईल.

सीएमआर ग्रीन टेक्नॉलॉजीज ॲल्युमिनियम रिसायकलिंग उद्योगातील आघाडीच्या मेटल रिसायकलर्सपैकी एक आहे. कंपनीत ॲल्युमिनियम संबंधीत उत्पादने घेतली जातात.

कंपनी झिंक अलॉई देखील निर्माण करते. कंपनी सध्या 12 उत्पादन सुविधा पुरवते. याव्यतिरिक्त, गुजरातमध्ये कोल्ड रिफाइनिंग प्लांट उभारण्याची प्रक्रिया सुरू आहे.

आयसीआयसीआय सिक्युरिटीज, ॲक्सिस कॅपिटल आणि जेएम फायनान्शियल हे बूकचे मुख्य व्यवस्थापक आहेत.

Comments are closed.