अरे बाप रे, फक्त काही मिनिटांत सबस्क्राईब झालाय आयपीओ

As per BSE data, the issue has been booked 3.1 times as of 10:38 am, led by strong demand from retail investors as the category has been subscribed 6.2 times.

पारस डिफेन्स आयपीओ जो आज सबस्क्रिप्शनसाठी उघडला गेला आहे आणि 23 सप्टेंबर रोजी बंद होणार आहे तो बिडिंगसाठी उघडल्यानंतर काही मिनिटांतच पूर्णपणे सबस्क्राइब झाला आहे. डिफेन्स कंपनीने या पब्लिक इश्यूमधून 171 कोटी गोळा करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे, त्यापैकी 140.6 कोटी न्यू इश्यूद्वारे तर 30 कोटी OFS (ऑफर फॉर सेल) द्वारे जमा केले जातील.

बीएसईच्या आकडेवारीनुसार, गुंतवणूकदारांच्या जोरदार मागणीमुळे सकाळी 10:25 मिनिटपर्यंत इश्यूचे 2.21 वेळा बुकिंग झाले आहे. रिटेल कॅटेगरी 4.39 वेळा, गैर-संस्थात्मक गुंतवणूकदार (एनआयआयएस) 0.03 वेळा आणि पात्र संस्थात्मक खरेदीदारांनी (क्यूआयबीएस) अद्याप बोली लावलेली नाही.

शेअर विक्रीची किंमत 165 ते 175 प्रति इक्विटी शेअरवर निश्चित करण्यात आली आहे. बाजार निरीक्षकांच्या मते, पारस डिफेन्सचे शेअर्स आज ग्रे मार्केटमध्ये 210 रु. च्या मजबूत प्रीमियमवर उपलब्ध आहेत.

पारस डिफेन्स आयपीओसंदर्भात 10 महत्त्वपूर्ण बाबी

1)पारस डिफेन्स IPO GMP

मार्केट ओब्जर्वरमते, पारस डिफेन्स आयपीओ ग्रे मार्केटचा प्रीमियम(जीएमपी) आज 210 रू आहे, जे त्याच्या कालच्या 200 च्या जीएमपीपेक्षा 10 ने जास्त आहे. त्यांच्यामते पारस डिफेन्सचे शेअर्स उपलब्ध झाल्यापासून ते 150 च्यावर ट्रेड करत आहेत. याद्वारे मार्केटचा एकूण कल समजतो .

2)पारस डिफेन्स आयपीओ सबस्क्रिप्शन तारीख

पब्लिक इश्यू आज म्हणजेच 21 सप्टेंबर 2021 उघडत आहे आणि ते 23 सप्टेंबर 2021 पर्यंत सबस्क्रिप्शनसाठी खुला राहील.

3) पारस डिफेन्स IPO किंमत

कंपनीच्या प्रमोटरनी पारस डिफेन्स IPO ची किंमत 165 ते 175 रू निश्चित केली आहे.

4)पारस डिफेन्स आयपीओ साइझ

डिफेन्स कंपनीने फ्रेश इश्यूसाठी 140.60 कोटी आणि ओएफएससाठी 30.18 कोटी वाटप करून त्याच्या सुरुवातीच्या ऑफरमधून 170.78 कोटी गोळा करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

5)पारस डिफेन्स आयपीओ लॉट साइझ

बोलीदारांना पब्लिक इश्यूसाठी लॉटमध्ये अर्ज करावा लागेल आणि एका लॉटमध्ये 85 शेअर्स असतील.

6) पारस डिफेन्स आयपीओ गुंतवणूक मर्यादा

एक बोलीदार आयपीओच्या किमान 1 लॉटसाठी अर्ज करू शकतो आणि एका बोलीदाराला जास्तीत जास्त 13 लॉटसाठी बोली लावण्याची परवानगी आहे. याचा अर्थ या डिफेन्स इश्यूमध्ये किमान गुंतवणूकीची मर्यादा 14,875 (175 x 85) आहे आणि या IPO मध्ये एका बोलीदारासाठी जास्तीत जास्त गुंतवणूक मर्यादा 1,93,375 (175 x 85 x 13) आहे.

7)पारस डिफेन्स आयपीओ वाटपाची तारीख

पारस डिफेन्स शेअर्स वाटपाची तात्पुरती तारीख 28 सप्टेंबर 2021 आहे.

8) पारस डिफेन्स आयपीओ लिस्टिंग

पारस डिफेन्सचे शेअर्स एनएसई (राष्ट्रीय स्टॉक एक्सचेंज) आणि बीएसई (बॉम्बे स्टॉक एक्सचेंज) या दोन्ही ठिकाणी लिस्टिंग केले जातील.

9)पारस डिफेन्स आयपीओ लिस्टिंग तारीख

पारस डिफेन्स शेअर्सच्या लिस्टिंगसाठी तात्पुरती तारीख 1 ऑक्टोबर 2021 आहे.

10) प्रमोटरची पोस्ट-लिस्टिंग होल्डिंग

पारस डिफेन्स शेअर्सच्या यशस्वी लिस्टिंगनंतर, कंपनीमध्ये प्रमोटरची हिस्सेदारी सध्याच्या 79.40 टक्क्यांवरून 59.71 टक्क्यांवर येईल.

Comments are closed.