‘या’ बँकेला मिळाला शेड्यूल पेमेंट्स बँकेचा दर्जा, निर्णयानंतर शेअर्स उसळीवर

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) पेटीएम पेमेंट्स बँकेला शेड्यूल पेमेंट्स बँकेचा दर्जा दिला आहे. हा निर्णय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कायदा, 1934 अंतर्गत घेण्यात आला आहे. शेड्यूल्ड पेमेंट बँक असल्याने, आता पेटीएम नवीन व्यवसाय संधींवर लक्ष केंद्रित करू शकते.

आरबीआयने सप्टेंबरमध्येच हा निर्णय घेतला होता आणि त्यानंतर ऑक्टोबरमध्ये त्याची अधिसूचना जारी केली होती. मात्र, आता पेटीएम पेमेंट्स बँकेने याची घोषणा केली आहे.

रिझर्व्ह बँकचा हा निर्णय पेटीएमचे शेअर्स वाढविण्यासाठी खूप महत्वाचा ठरला आहे.

यामुळे बँकेला अनेक फायदे मिळणार आहेत, आता शेड्युल्ड बँकेचा दर्जा मिळाल्यानंतर पेटीएम पेमेंट्स बँक सरकार आणि इतर मोठ्या कंपन्यांच्या प्रस्तावात सहभागी होऊ शकणार आहे. याशिवाय त्याला प्राथमिक लिलावातही हजेरी लावता येणार आहे. बँक निश्चित दर आणि रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेटमध्ये देखील सहभागी होऊ शकेल. इतकेच नाही तर फर्म मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटीसाठी पार्टनर बनू शकेल. पेटीएम पेमेंट्स बँक आता सरकारद्वारे चालवल्या जाणार्‍या आर्थिक समावेशन योजनांमध्ये सहभागी होण्यास पात्र आहे.

पेटीएमचे 33.3 मिलियन युजर्स आहेत. कंपनीचे सुमारे 333 मिलियन ग्राहक आणि 114 मिलियन वार्षिक व्यवहार करणारे युजर्स आणि 210 मिलियन नोंदणीकृत व्यापारी आहेत.

Comments are closed.