पॉलिसीबाजार IPO ला तुफान मागणी, ‘तब्बल’ इतक्या वेळा केला गेलाय सबस्क्राइब

PB फिनटेकच्या IPO ला सध्या गुंतवणूकदारांकडून चांगलीच पसंती मिळत आहे. IPO ला 3.45 कोटी इक्विटी शेअर्सच्या तुलनेत एकूण 7.04 कोटी इक्विटी शेअर्ससाठी बोली मिळाली. यामुळे 2.04 वेळा सबस्क्रिप्शनसाठी बोली लागली.

पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारासाठी एकूण ऑफरचा 75 टक्के हिस्सा राखीव आहे, त्यावर 2.72 पट बोली लागली. गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांनी त्यांच्या एकूण आरक्षित भागापैकी 37 टक्के शेअर्स खरेदी केले.

IPO ला रिटेल गुंतवणूकदारांचा देखील प्रतिसाद मजबूत मिळाला, कारण त्यांच्यासाठी राखीव असलेला भाग 2.39 पट सबस्क्राइब केला गेला.

पॉलिसीबझार IPO 1 नोव्हेंबर रोजी 5,700 कोटी उभारण्याच्या उद्दिष्टाने उघडण्यात आला आहे, त्यापैकी 2,569 कोटी रुपये आधीच 29 ऑक्टोबर रोजी अँकर बुकद्वारे उभारले जात आहेत. ऑफरमध्ये 3,750 कोटींचा फ्रेश इश्यू आणि 1960 कोटीची विक्रीची ऑफर आहे.

फ्रेश इश्यूमधून मिळालेल्या उत्पन्नाचा उपयोग ब्रँड्सची विसिबिलीटी आणि जागरूकता वाढवण्यासाठी 1,500 कोटी, ऑफलाइन ग्राहक क्षमतेसाठी 375 कोटी , धोरणात्मक गुंतवणूक आणि अधिग्रहण यासाठी 1,500 कोटी तर उर्वरित रक्कम फर्म विस्तार करण्यासाठी वापरली जाईल.

आर्थिक वर्ष 2019 ते 2021 या कालावधीत कंपनीच्या 2 वर्षांच्या CAGR मध्ये 34% वाढ झाली आहे. भविष्यातही भरपूर वाढीची अपेक्षा वर्तवली जात आहे.

ब्रोकरेजनुसार गुंतवणूकदारांनी लिस्टिंगसाठी तसेच दीर्घकालीन नफ्यासाठी IPO मध्ये गुंतवणूक करण्याचा विचार केला पाहिजे.

यशिश दहिया आणि आलोक बन्सल यांनी स्थापन केलेल्या PB फिनटेकने टेक्नॉलॉजी, डेटा यांच्याआधारे भारतातील सर्वात मोठे ऑनलाइन व्यासपीठ तयार केले आहे.

Comments are closed.