मन्नतपासून आयुष्याच्या जन्नतपर्यंत! शाहरुख खानची प्रॉपर्टी पाहून भले-भले होतात दंग
दोन नोव्हेंबर म्हणजे बॉलिवूडचा बादशाहा किंग खान शाहरुख खानचा वाढदिवस! बर, दोन नोव्हेंबरला किंग खानचा वाढदिवस आहेच, पण ह्या वाढदिवसाला सध्या बऱ्याच गोष्टींची किनार देखील आहे. मुलगा आर्यनचे देशभर गाजलेले प्रकरण, जामीनासाठी करावे लागलेले शर्थीचे प्रयत्न या बऱ्याच गोष्टी या वाढदिवशी हायलाईट होत आहेत.
दरम्यान, आजमितीला शाहरुखने वयाची ५६ वर्ष पूर्ण केली आहेत. सुरुवातीला एक स्ट्रगलिंग ॲक्टर ते बॉलिवूडचा बादशाह हा प्रवास शाहरुखसाठी खूपच खडतर होता. आपल्या अभिनय कौशल्याने आणि जिद्दीने शाहरुखने अनेक शिखरे पादक्रांत केली. असं असलं तरी आपली वेबसाईट ही पैशांशी संबंधीत बातम्या देते मग हे स्टार, हिरोमधे कुठे घुसले असं तुम्हाला वाटलं असेल. तर तसं नाही मंडळी. आपण आज शाहरुखच्या या दुसऱ्या बाजूवरच प्रकाश टाकणार आहोत.
चला तर,पैसापाणीच्या वाचकांसाठी आम्ही घेऊन आलो आहोत किंग खानने आर्थिक स्तरावर केलेल्या प्रगतीचा लेखाजोखा –
शाहरुखचा मन्नत
1997 मध्ये येस बॉस चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान शाहरुखने प्रथमच मन्नत बंगला पाहिला. बंगल्याचे तत्कालीन नाव व्हिला व्हिएन्ना होते. शाहरुख खानने २००१ मध्ये खुर्शेद बानू ट्रस्टकडून हा बंगला खरेदी केला होता. रिपोर्ट्सनुसार, शाहरुखने यासाठी त्यावेळी १३.३२ कोटी रुपये मोजले होते, ज्याची आताची किंमत ही तब्बल ४०० कोटीच्या घरात आहे. सदर बंगला हा सहा मजली आहे. शाहरुख खानचा दुबईत पाम जुमेरा नावाचा बंगला देखील आहे, ज्याची किंमत २४ कोटींच्या आसपास आहे. शाहरुखचे लंडनच्या पार्क लेनमध्ये १७२ कोटींचे स्वतःचे घर देखील आहे.
शाहरुखकडील कार
शाहरुख ४ कोटींची बेंटले कॉन्टिनेंटल GT कार वापरतो. याशिवाय त्याच्याकडे ऑडी ४६ ही कारदेखील आहे, जीची किंमत 56 लाख रुपये आहे. याशिवाय 4.1 कोटीची रोल्स रॉयल, १.३ कोटीची BMW 6 , २ कोटीची BMW 7 आणि २.६ कोटीची BMW 8 शाहरुखकडे आहे. त्याच्याकडे एक स्पोर्ट्स कार देखील आहे, जीची किंमत १४ कोटी रुपये आहे. शाहरुख खानकडे मर्सिडीज बेंझ S600 गार्ड देखील आहे, जीची किंमत २.८ कोटी रुपये आहे. शाहरुखकडे एक प्रायव्हेट जेट देखील आहे.
व्हॅनिटी आणि बाईक
किंग खान सर्वात महागड्या व्हॅनिटी व्हॅनचा मालक आहे, जीची किंमत 5 कोटी इतकी आहे. शाहरुखकडे हार्ले डेविडसन डायना स्ट्रीट बॉब आहे जी एक टियर रग्ड क्रूझर बाइक आहे, तीची किंमत १० लाख रुपये इतकी आहे.
संपत्ती
फोर्ब्सने शाहरुख खानला श्रीमंत स्टार्सच्या यादीत स्थान दिलेले आहे. त्याची एकूण संपत्ती ६०० मिलियन डॉलर असल्याचे बोलले जाते. शाहरुख केवळ चित्रपटातूनच नाही तर जाहिरातींमधूनही करोडोंची कमाई करतो. त्याच्या प्रॉडक्शन हाऊस रेड चिलीज एंटरटेनमेंटची वार्षिक कमाई ५०० कोटींहून अधिक आहे.
जाहिरातीतून कमाई
किंग खान पेप्सी, व्हर्लपूल, नोकिया, ह्युंदाई, टॅग ह्युअर, डिश टीव्ही, बिग बास्केट आणि बायजूचा ब्रॅण्ड ॲम्बेसेडर आहे. एका जाहिरातीसाठी तो सुमारे ३.५-४ कोटी रुपये इतकी फी घेतो.
क्रिकेट टीमचा मालक
किंग खान खेळात देखील गुंतवणूक करुन ठेवतो आहे. आजघडीला तो कोलकाता नाईट रायडर्स आणि त्रिनिदाद नाईट रायडर्सचा तो मालक आहे. तसेच त्याने दक्षिण आफ्रिकेतील टी२० लीगमधेही एक संघ घेतला आहे.
Comments are closed.