प्राज इंडस्ट्रीजचा Q2 रिझल्ट जाहीर! असं आहे नफा- तोट्याचे गणित
PAT has tripled from 11 Cr to 33 Cr in the last year
प्राज इंडस्ट्रीजने दुस-या तिमाहीत 33 कोटीचा नेट प्रॉफिट नोंदवला. कंपनीचा PAT गेल्या वर्षाच्या कालावधीत केवळ 11.39 कोटींवरून तिप्पट होऊन 33.33 कोटी झाला. या तिमाहीत ऑपरेशन्समधून मिळणारा महसूल दुपटीने वाढून 532 कोटी इतका झाला, जो मागील वर्षीच्या याच कालावधीत 260 कोटी होता.
बुधवारी, प्राज इंडस्ट्रीजचा शेअर NSE वर 5% वाढून 338.25 वर क्लोज झाला. 2021 च्या सुरुवातीपासून, स्क्रिपने 181.52% च्या वाढीसह गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा दिला आहे. गेल्या एका वर्षात स्टॉक 333% ने वाढला आहे.ऑगस्ट 2020 मध्ये स्टॉक 68 वर ट्रेड करत होता. सध्या हीच किंमत 337 रुपयांवर जाऊन पोहोचली आहे.
प्राज इंडस्ट्रीज देशांतर्गत डिस्टिलरी आणि ब्रुअरी इन्स्टॉलेशन व्यवसाय करते. पुण्यात मुख्यालय असलेली ही कंपनी इथेनॉल प्लांटची पुरवठादार आहे. इथेनॉलचे उत्पादन वाढवण्यावर सरकारचे लक्ष केंद्रित केल्याने कंपनीला महत्त्व प्राप्त होत आहे. मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह जैवइंधन तंत्रज्ञानातील इथेनॉल वापर याचा कंपनीला अधिक फायदा होईल.
चांगल्या रिझल्टच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी सकाळी प्राजच्या शेअरमध्ये २% वाढ झालेली दिसून आली.
Comments are closed.