गुंतवणूकदारांनो लागा तयारीला! ‘ही’ फर्म आणणार 2000 कोटींचा IPO
Rainbow Children's Medicare Ltd, ने सेबीकडे IPO साठी कागदपत्रेदाखल केले आहेत. फर्म IPO द्वारे 2,000 कोटींहून अधिक निधी उभारणार आहे. फर्मला UK येथील वित्तीय संस्था CDC Group Plc चे समर्थन आहे.
Rainbow Children’s Medicare Ltd, ने सेबीकडे IPO साठी कागदपत्रेदाखल केले आहेत. फर्म IPO द्वारे 2,000 कोटींहून अधिक निधी उभारणार आहे. फर्मला UK येथील वित्तीय संस्था CDC Group Plc चे समर्थन आहे.
फर्मने 1999 मध्ये हैदराबादमध्ये पहिले 50 खाटांचे बालरोग विशेष रुग्णालय सुरू केले. तेव्हापासून, कंपनीने मल्टी-स्पेशालिटी बालरोग सेवांमध्ये स्वतःचे नाव कमावले आहे. कंपनीकडे गंभीर आजारांच्या व्यवस्थापनामध्ये मजबूत क्लिनिकल स्किल आहे.
जमा झालेला पैसा कुठे वापरणार?
पीटीआयच्या अहवालानुसार IPO आकार 2,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त असण्याची अपेक्षा आहे. पब्लिक इश्यूमध्ये 280 कोटी रुपयांपर्यंतच्या इक्विटी शेअर्सचा फ्रेश इश्यू आणि विद्यमान स्टेकहोल्डरद्वारे 2.4 कोटी इक्विटी शेअर्सची ऑफर विक्रीचा समावेश आहे. प्रमोटी रमेश कंचर्ला, दिनेश कंचर्ला आणि आदर्श कंचर्ला आणि गुंतवणूकदार सीडीसी ग्रुप, सीडीसी इंडिया ऑफर फॉर सेलद्वारे शेअर्स ऑफलोड करतील.
Rainbow Children’s Medicare ने नॉन-कन्व्हर्टेबल डिबेंचर (NCDs) ची लवकर पूर्तता करण्यासाठी, नवीन रुग्णालये उभारण्यासाठी आणि अशा नवीन रुग्णालयांसाठी वैद्यकीय उपकरणे खरेदी करण्यासाठी फ्रेश इश्यूची रक्कम वापरण्याचा प्रस्ताव दिला आहे. याशिवाय, ही रक्कम सामान्य कॉर्पोरेट कारणांसाठी देखील वापरली जाईल.
30 सप्टेंबर 2021 पर्यंत, रेनबो भारतातील सहा शहरांमध्ये 14 रुग्णालये आणि तीन दवाखाने चालवते. त्यांची एकूण क्षमता 1500 खाटांची आहे. त्यांच्या मुख्य वैशिष्ट्यांमध्ये बालरोगाचा समावेश आहे, यामध्ये प्रसूती आणि स्त्रीरोगशास्त्र देखील समाविष्ट आहे.
Comments are closed.