राकेश झुनझुनवाला यांची गुंतवणूक असलेली कंपनी आणतेय IPO, प्राइस बँड झाला निश्चित

सेफक्रॉप इन्व्हेस्टमेंट्स इंडिया, वेस्टब्रिज आणि राकेश झुनझुनवाला समर्थित स्टार हेल्थ अँड अलाईड इन्शुरन्स कंपनीने त्यांच्या पहिल्या पब्लिक ऑफरसाठी प्रति शेअर 870-900 रुपयांचा प्राइस बँड निश्चित केला आहे .

सेफक्रॉप इन्व्हेस्टमेंट्स इंडिया, वेस्टब्रिज आणि राकेश झुनझुनवाला समर्थित स्टार हेल्थ अँड अलाईड इन्शुरन्स कंपनीने त्यांच्या पहिल्या पब्लिक ऑफरसाठी प्रति शेअर 870-900 रुपयांचा प्राइस बँड निश्चित केला आहे. सदर पब्लिक इश्यू 30 नोव्हेंबर रोजी सबस्क्रिप्शनसाठी उघडेल आणि 2 डिसेंबर 2021 रोजी बंद होईल. जर अँकर बुक असेल तर, इश्यू सुरू होण्याच्या एक दिवस आधी म्हणजेच 29 नोव्हेंबर रोजी गुंतवणूकदारांसाठी एक दिवसासाठी उघडू शकेल.

IPO मध्ये 2,000 कोटीचे फ्रेश शेअर्स असतील. याशिवाय सेफक्रॉप इन्व्हेस्टमेंट इंडिया एलएलपी, कोणार्क ट्रस्ट आणि MMPL ट्रस्ट हे स्टेकहोल्डर्स एकूण 5.83 कोटी शेअर्स ऑफर फॉर सेल द्वारे ऑफलोड करतील.  APIS growth 6, MIO IV Star, MIO Star, Notre Dame DU LAC University, ROC Capital Pty Limited, वेंकटसामी जगन्नाथन, साई सतीश आणि Berjis Minoo Desai हे देखील OFS द्वारे कंपनीतील त्यांचे काही शेअरहोल्डिंग ऑफलोड करतील. कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी 100 कोटी रुपयांचे शेअर्स राखून ठेवले आहेत.

हा पब्लिक इश्यू स्टार हेल्थला अप्पर प्राइस बँडवर 7,249.18 कोटी मिळवून देईल. चालू वर्ष 2021 ममध्ये हा तिसरा सर्वात मोठा IPO असेल. फ्रेश इश्यूमधून मिळणारे निव्वळ उत्पन्न कंपनीचा भांडवल आधार वाढवण्यासाठी आणि सॉल्व्हन्सी पातळी राखण्यासाठी वापरला जाईल.

गुंतवणूकदार किमान 16 इक्विटी शेअर्ससाठी आणि त्यानंतर 16 शेअर्सच्या पटीत बोली लावू शकतात. किरकोळ गुंतवणूकदार एका लॉटसाठी किमान 14,400 रुपयाची गुंतवणूक करू शकतात आणि त्यांची कमाल गुंतवणूक 13 लॉटसाठी (208 इक्विटी शेअर्स) 1,87,200 रू.असू शकेल.

स्टार हेल्थ प्रामुख्याने आरोग्य, अपघात आणि परदेशी प्रवासासाठी लवचिक आणि सर्वसमावेशक कव्हरेज पर्यायांची श्रेणी ऑफर करते. FY21 मध्ये भारतीय आरोग्य विमा बाजारपेठेत 15.8 टक्के बाजारपेठेसह भारतातील सर्वात मोठी खाजगी आरोग्य विमा कंपनी असल्याचा दावा कंपनी करते. FY21 मध्ये रिटेल हेल्थ आणि ग्रूप हेल्थ सेगमेंटमध्ये कंपनीचे योगदान 87.9 टक्के आणि GWP 10.5 टक्के आहे.

सध्या, राकेश झुनझुनवाला, सेफक्रॉप इन्व्हेस्टमेंट इंडिया एलएलपी आणि वेस्टब्रिज एआयएफ यांच्यासह एकूण प्रवर्तकांची कंपनीत 66.22 टक्के हिस्सेदारी आहे. राकेश झुनझुनवाला आणि त्यांची पत्नी रेखा झुनझुनवाला हे 18.21 टक्के शेअर्ससह कंपनीतील दुसऱ्या क्रमांकाचे शेअरहोल्डर आहेत, तर सेफक्रॉप इन्व्हेस्टमेंट्स इंडिया एलएलपी ही 47.77 टक्के हिस्सेदारीसह सर्वात मोठी शेअरहोल्डर आहे.

पब्लिक इश्यू बंद झाल्यावर, शेअर वाटप 7 डिसेंबर 2021 पर्यंत अंतिम केले जाईल. अयशस्वी गुंतवणूकदारांना 8 डिसेंबरपर्यंत त्यांच्या बँक खात्यांमध्ये परतावा मिळेल आणि यशस्वी गुंतवणूकदारांना 9 डिसेंबरपर्यंत त्यांच्या डीमॅट खात्यांमध्ये शेअर्स मिळतील. इक्विटी शेअर्समधील ट्रेडिंग 10 डिसेंबरपासून सुरू होईल.

कोटक महिंद्रा कॅपिटल कंपनी, अॅक्सिस कॅपिटल, बोफा सिक्युरिटीज इंडिया, सिटीग्रुप ग्लोबल मार्केट्स इंडिया, आयसीआयसीआय सिक्युरिटीज, सीएलएसए इंडिया, क्रेडिट सुईस सिक्युरिटीज (इंडिया), जेफरीज इंडिया, अॅम्बिट, डॅम कॅपिटल अॅडव्हायझर्स, आयआयएफएल सिक्युरिटीज हे या इश्यूचे मुख्य व्यवस्थापक आहेत.

Comments are closed.