BPCL उभारणार ग्रीन हायड्रोजन प्लांट – वाचा सविस्तर माहिती

भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन (BPCL) लवकरच देशातील सर्वात मोठा ग्रीन हायड्रोजन प्लांट तयार करण्यासाठी 20 MW क्षमतेच्या इलेक्ट्रोलायझरसाठी निविदा काढणार आहे.

भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन (BPCL) लवकरच देशातील सर्वात मोठा ग्रीन हायड्रोजन प्लांट तयार करण्यासाठी 20 MW क्षमतेच्या इलेक्ट्रोलायझरसाठी निविदा काढणार आहे. सदर निविदेचे मुख्य कारण म्हणजे 2040 पर्यंत त्यांच्या एकूण ऑपरेशनसाठी झीरो इमिशन साध्य करण्याचे उद्दिष्ट आहे, असे कंपनीचे अध्यक्ष अरुण कुमार सिंह यांनी सांगितले.

BPCL सध्या यावर काम करत आहे आणि पुढील मार्चपर्यंत त्याचा नेट झीरो रोडमॅप पक्का करण्याचे उद्दिष्ट आहे असेही सिंग यांनी सांगितले. नवीन प्लांटमध्ये बीपीसीएलच्या रिफायनरीज, पाइपलाइन, डेपो आणि बॉटलिंग प्लांटसह आमच्या सर्व ऑपरेशन्सचा समावेश करेल.

हवामान बदलाच्या चिंतेने बऱ्याच मोठ्या अर्थव्यवस्थांना आणि अनेक कंपन्यांना प्रगतीसाठी नेट झीरो ग्रीन हाऊस गॅस एमिशनचे उद्दिष्ट समोर ठेवण्यासाठी प्रवृत्त केले आहे. ऑईल क्षेत्रातील प्रमुख बीपी आणि शेल 2050 पर्यंत तर बाजार मूल्यानुसार भारतातील सर्वात मोठी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजने 2035 पर्यंत नेट झीरो उद्दिष्ट साध्य करण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

BPCL सध्या 650 मेगावॅट ऊर्जा वापरते. यामध्ये 550 मेगावॉट ग्रीड पॉवरचा समावेश आहे. हा वापर २०२७ पर्यंत 1000 मेगावॉट पर्यंत वाढेल असा अंदाज आहे. ग्रीन हायड्रोजन तयार करण्यासाठी ते मध्य प्रदेशातील बीना येथील रिफायनरीमध्ये 20 मेगावॅटचे इलेक्ट्रोलायझर लावणार आहे. गेलने नुकतेच 10 मेगावॉट क्षमतेच्या इलेकट्रोलायझरचे टेंडर काढले होते. बीपीसीएलच्या प्लँटची क्षमता दुप्पट असेल.

बीपीसीएल येत्या काही वर्षांत ७००० ईव्ही चार्जिंग स्टेशन्सदेखील सुरु करणार आहे. इंडियन ऑइल, एचपीसीएल, बीपीसीएल मिळून भारतभरात सध्या ८०,००० पेट्रोल पंप आहेत. या तीन कंपन्या मिळून एकूण २२००० ईव्ही चार्जिंग स्टेशन्स सुरु करणार आहेत.

Comments are closed.