‘या’ बँकेत LIC चा स्टेक होणार दुप्पट ,RBI ने दिली परवानगी

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून मिळालेल्या माहितीनुसार इंडसइंड बँकेने बँकेच्या स्टेकहोल्डर लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशनला (LIC) बँकेतील हिस्सेदारी वाढवण्याची परवानगी दिली आहे. आता LIC चा हिस्सा 9.9 टक्के झाला आहे. याअगोदर LIC कडे सध्या IndusInd च्या एकूण स्टेकपैकी 4.95% हिस्सा आहे.

सदर परवानगी एका वर्षाच्या कालावधीसाठी म्हणजे 8 डिसेंबर 2022 पर्यंत वैध आहे. बीएसईवर शुक्रवारच्या उघडलेल्या डीलमध्ये इंडसइंड बँकेचे शेअर्स 1% पेक्षा जास्त ट्रेड करत होते.

एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया,फॉरेन एक्स्चेंज मॅनेजमेंट ऍक्ट, 1999 च्या तरतुदीनुसर हा निर्णय घेतला आहे. ही मान्यता एका वर्षाच्या कालावधीसाठी वैध आहे,” असे इंडसइंड बँकेने आज एक्सचेंज फाइलिंगमध्ये सांगितले.

RBI च्या नियमानुसार 5% पेक्षा जास्त भागीदारी खाजगी बँकांमध्ये संपादन करू इच्छिणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला किंवा संस्थेला केंद्रीय बँकेकडून पूर्वपरवानगी घ्यावी लागते.

Comments are closed.