“हॅलो तुम्ही KYC अपडेट केलं का’? असा कॉल आला तर”? RBI ने दिलं महत्वाचं स्टेटमेंट…
RBI Advises on How to Protect your Bank Account against KYC Updation Scam
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ने सोमवारी ग्राहकांना केवायसी डिटेल्स संबंधीत होणाऱ्या फ्रॉड बाबत सतर्क केले. बँकेने अज्ञात व्यक्तींस कोणतीही वैयक्तिक किंवा आर्थिक माहिती शेअर करु नका अस सांगितल.
केवायसी अद्ययावत करण्याच्या नावाखाली अनेक ग्राहक फसवणुकीला बळी पडल्याच्या अनेक तक्रारी बँकेकडे आल्यानंतर बँकने हे स्टेटमेंट जारी केलं.
बँकेने म्हटले आहे की अशा प्रकरणांमध्ये अज्ञात व्यक्तीकडून ग्राहकाला कॉल, ईमेल किंवा मेसेज येतात. त्याद्वारे ग्राहकांकडे वैयक्तिक माहिती जसे की अकाउंट लॉगिन, कार्ड नंबर किंवा एटीएम पिन मागितला जातो.
आरबीआयने म्हटले आहे की, “अशा कम्युनिकेशनमध्ये खाते फ्रीज करण्याची किंवा ब्लॉक करण्याची धमकी दिली जाते.” त्यामुळे ग्राहक कॉल/ मेसेज/अनधिकृत ॲपवर आपली माहिती शेअर करतात आणि फसवणूक करणाऱ्यांना ग्राहकांच्या खात्यात प्रवेश मिळतो आणि फसवणूक होते.”
आरबीआयने लोकांना अकाउंट लॉगिन तपशील, वैयक्तिक माहिती, केवायसी डॉक्युमेंट्सच्या प्रती, कार्ड माहिती, पिन, पासवर्ड, ओटीपी इत्यादी अज्ञात व्यक्ती किंवा एजन्सीला शेअर करण्यापासून सावध केले.
आरबीआयने बँकांना असेही सुचवले की ज्या खात्यांमध्ये KYC अपडेट करणे बाकी आहे. अशा खात्यांच्या ऑपरेशनवर ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत कोणतेही निर्बंध लादले जाणार नाहीत.
RBI cautions against frauds in the name of KYC updationhttps://t.co/rg6eEb56h5
— ReserveBankOfIndia (@RBI) September 13, 2021
Comments are closed.