कॅश ट्रांझॅक्शन करताय? आरबीआय पाठवेल नोटीस
5 Types of cash transactions that might attract RBI's attention
गेल्या काही वर्षांत अनेक बँका, म्युच्युअल फंड्स आपल्या गुंतवणूकदारांना कॅश ट्रांझॅक्शन करण्यापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. यासाठी त्यांनी आपले नियमदेखील कडक केले आहेत. तरीही काहीजण या नियमांकडे दुर्लक्ष करून कॅश ट्रांझॅक्शन करताना दिसतात. अशा लोकांनी आता सावध राहण्याची गरज आहे कारण या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना आता थेट आरबीआयकडून नोटीस येत आहे.
तुम्ही जर खालीलपैकी कुठलेही कॅश ट्रांझॅक्शन केले तर तुम्हाला आरबीआयची नोटीस येऊ शकते.
१. बँकेतील एफडी – बँकेत कॅश डिपॉझिट करून एफडी करू शकता. मात्र त्याची मर्यादा १० लाख रुपये एवढी आहे. ही मर्यादा ओलांडणे तुम्हाला महागात पडू शकते.
२. प्रॉपर्टी – कुठलीही रियाल इस्टेट इन्व्हेस्टमेंट करताना त्यामध्ये ३० लाखांपेक्षा अधिकचे कॅश ट्रांझॅक्शन करू नका. प्रॉपर्टी डीलमध्ये ३० लाखांपेक्षा अधिकचे कॅश ट्रांझॅक्शन आरबीआयच्या नजरेत येऊ शकते.
३. सेव्हिंग्ज आणि करंट अकाऊंट – कोणत्याही सेव्हिंग्ज अकाऊंटमध्ये कॅश डिपॉझिटची मर्यादा १ लाख रुपये ठरवून देण्यात आली आहे. करंट अकाऊंटसाठी हीच मर्यादा ५० लाख रुपये एवढी आहे. या मर्यादेचे उल्लंघन केल्यास तुम्हाला आरबीआयची नोटीस येऊ शकते.
४. म्युच्युअल फंड, स्टॉक मार्केट, बॉंड्स – म्युच्युअल फंड, स्टॉक मार्केट, बॉंड्स, डिबेंचर्स यांसारख्या ठिकाणी गुंतवणूक करताना १० लाखापेक्षा अधिक कॅश डिपॉझिट करू नये. असे केल्यास आरबीआयची नोटीस येऊ शकते.
५. क्रेडिट कार्ड बिल पेमेंट – क्रेडिट कार्डचे बिल भरताना १ लाखांपेक्षा अधिक कॅश वापरून भरू नका. असे केल्यास एवढी कॅश कुठून आली? असा प्रश्न उभा राहून आरबीआय तुम्हाला नोटीस पाठवू शकते.
Comments are closed.