पैसापाणी विकली स्टॉक – हिंद कॉपर

Weekly Stock Analysis Series

कमोडिटी सायकल चालू आहे असे जवळपास प्रत्येक गुंतवणूकदार बोलताना दिसतोय. येत्या काही वर्षात कमोडिटीचे शेअर्स अनेक पटीने वाढतील असे सुद्धा ऐकायला मिळते. पण नवीन गुंतवणूकदारांना आपण नक्की कश्यात गुंतवणूक करावी हा प्रश्न पडतो. त्याच बरोबर इलेक्ट्रिक व्हेईकल सुद्धा काही वर्षात अधिक प्रमाणात दिसून येतील. त्याचा फायदा नक्की कोणत्या कोणत्या शेअर्सला होणार हा सुद्धा एक प्रश्न असतोच. तर या दोन्ही गोष्टींमध्ये कॉपर हा एक समान आणि महत्वपूर्ण धागा आहे.

कॉपरच्या किंमतीत दिवसेंदिवस वाढ होत आहे पण त्याचा साठा मात्र त्या प्रमाणात वाढत नाही. २०११ साला नंतर पहिल्यांदा कॉपरच्या लंडन मेटल इंडेक्सने १०,००० डॉलरची किंमत ओलांडत ऑल टाईम हाय चा टप्पा गाठला. कॉपर ची मागणी वाढतेय तर त्याचा परिणाम सर्वात जास्त होईल तो हिंदुस्तान कॉपर लिमिटेड या कंपनीच्या शेअर वर.

या कंपनी बद्दल थोडक्यात माहिती घेऊ
भारतात कॉपरच्या खाणी असलेली ही एकमेव कंपनी आहे. तसेच रेफाईन कॉपरचे उत्पादन करणारी सुद्धा ही एकमेव कंपनी आहे. कंपनीचे झारखंड, महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश आणि राजस्थान मध्ये खाणी तसेच रेफाईनिंग आणि स्मेल्टिंगचे युनिट्स आहेत.
कंपनीचे कॉपर कॉन्संट्रेट, कॅथोड, कॉपर वायर रॉड हे प्रॉडक्ट्स आहेत.
कॅथोडची शुद्धता ९९.९९% आहे जे लंडन मेटल इंडेक्स च्या A ग्रेडमध्ये येते.
वायर रॉड ८, ११, १२.५, १६, १९.६ एमएम डायमिटरचे आहेत.

कॉपर ची वाढती मागणी पाहता कंपनी आपला बिझनेस वाढवते आहे. कंपनीने मध्यप्रदेश, राजस्थान आणि झारखंडच्या खाणी मध्ये उत्पादन ३.७१ मिलियन टन वरून ८.२ मिलियन टन प्रति वर्ष वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच बंद असलेल्या झारखंड मधल्या दोन खाणी पुन्हा चालू करण्याचा कंपनीचा प्रस्ताव आहे. त्या खाणीमधून १.९ मिलियन टन प्रति वर्ष उत्पादन करणार आहे. तसेच नवीन खाणी मधून २.१ मिलियन टन प्रति वर्ष उत्पादन करण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे. २०२२ ला याची सुरुवात होणार आहे.

कंपनीच्या आर्थिक स्थितीबद्दल
कंपनीचा महसुलात पण वाढ होताना दिसते आहे. २०१९-२० या आर्थिक वर्षात कंपनीचा महसूल ८८८.८ कोटी एवढा होता तर डिसेंबर २०२० मध्ये १२९ कोटी एवढा झाला. तसेच २०१९-२० या वर्षात कंपनीला ५६९.४ कोटी चा तोटा झाला होता तर डिसेंबर २०२० ला १४६.८ कोटी फायदा झाला आहे.
कंपनीचे ७६.०५% शेअर्स प्रमोटर्स कडे म्हणजेच भारत सरकार कडे आहेत. तसेच मागील तीन महिन्यात एफपीआयने आपला स्टेक ०.४१% वरून ०.७१% पर्यंत वाढवला आहे.

कंपनीचा टेक्निकल ॲनालिसिस बघुया

कंपनीचा चार्ट हा मार्च २०२० पासून अपट्रेंड ला आहे. डेली चार्ट वर कप आणि हॅण्डल पॅटर्न तयार झाला असून तो ब्रेक आऊट होऊन शुक्रवारी रिटेस्ट सुद्धा झाला आहे. येत्या काही दिवसात कंपनीचा शेअर चांगला परफॉर्म करू शकतो. तसेच कॉपरची एकंदर मागणी आणि पुरवठा पाहता लाँग टर्म मध्ये सुद्धा हा शेअर चांगला परतावा देऊ शकतो.

Comments are closed.