इन्कम टॅक्स वाचवण्यासाठी डोनेशन देताय? आधी हे वाचा 

With the new Income Tax portal launched, be ready to face some issues with 80G claims

कोविडचे संकट तसेच बिहार,उत्तर प्रदेश,हिमाचल प्रदेश आणि कर्नाटक या राज्यांतील पूर यासारख्या नैसर्गिक आपत्तींमुळे आपल्यापैकी अनेकांना तेथील नागरिकांसाठी मदतीचा हात पुढे करायला लावला आहे. पण जर तुम्हाला तुम्ही देऊ केलेल्या डोनेशनवर इन्कम टॅक्स  कपातीची अपेक्षा असेल आधी हे वाचा. या वर्षापासून डोनेशनवर मिळणाऱ्या इन्कम टॅक्स सवलतीत काही बदल झाले आहेत.  केवळ ठराविक चॅरिटेबल ट्रस्टला दिलेले डोनेशनच कर कपातीसाठी पात्र असतील, हेही लक्षात असूद्या.

ट्रस्ट सरकारकडे नोंदणीकृत आहे का?
या आर्थिक वर्षापासून,चॅरिटेबल ट्रस्टने इन्कम टॅक्स विभागाकडे नोंदणी करणे आवश्यक आहे. ही नोंदणी केल्यावर त्या ट्रस्टला एक नोंदणी क्रमांक दिला देईल.
परंतु नुकत्याच लाँच झालेल्या इन्कम टॅक्सच्या नवीन वेबसाइटला

अनेक समस्यांनी घेरले आहे. त्यात चॅरिटेबल ट्रस्टची नोंदणी करण्याचे हे पहिलेच वर्ष आहे. त्यामुळे सध्यातरी कोणत्याही ट्रस्टने नोंदणी केलेली नाही. त्यामुळे तुम्ही एखाद्या संस्थेला डोनेशन दिले तर त्यावर तुम्हाला कोणताही टॅक्स बेनिफिट मिळणार नाही.

चॅरिटेबल ट्रस्टसाठी नोंदणी अनिवार्य का आहे?

गेल्या अनेक वर्षांपासून, सरकारचे बनावट डोनेशन क्लेममुळे मोठे नुकसान होत आहे. TaxSpanner.com चे सह-संस्थापक आणि एमडी सुधीर कौशिक म्हणाले की सरकारला असे आढळून आले आहे की, टॅक्स बेनिफिटचा फायदा घेण्यासाठी अनेक बनावट कंपन्या बनवण्यात आल्या. त्यांना डोनेशन दिले असे दाखवून काळा पैसा पांढरा केला गेला. ट्रस्टद्वारे इंटरेस्ट इन्कमसुद्धा घोषित केले जात नव्हते आणि प्रत्यक्षात डोनेशन दिले आहे किंवा नाही हे तपासण्यासाठी कोणतेही साधन नव्हते.

 

इन्कम टॅक्सच्या 80G  कलमाचा फायदा घेण्यासाठी ट्रस्टच्या TAN, PAN आणि पत्त्याची गरज लागत असे. आता ज्या चॅरिटेबल ट्रस्टला तुम्ही दान केले आहे त्याची सरकारकडे नोंदणी असणे आवश्यक आहे.

कर कपातीसाठी पात्र संस्था
पंतप्रधान / मुख्यमंत्र्यांच्या मदत निधीमध्ये डोनेशन देणे कधीही जास्त सुरक्षित आहे. या निधीमध्ये जे वैयक्तिक करदाते डोनेशन देतील ते कर कपातीसाठी पात्र असतील. विविध सरकारी संस्थांद्वारे चालवले जाणारे चॅरिटेबल ट्रस्ट हेही तुम्हाला कलम 80G नुसार कर कपातीचे लाभ देण्यासाठी पात्र असतील.

पूर्ण १०० टक्के क्लेम केला जाऊ शकतो का?
सरकारने निवडक चॅरिटेबल ट्रस्ट हे १०० टक्के कर कपातीसाठी पात्र असतील, तर इतर फक्त ५० टक्के कर कपातीसाठी पात्र असतील असं घोषित केलं आहे. 80G मध्ये क्लेम करण्याची आणखी एक अट अशी आहे की, दान केलेल्या रकमेच्या १०० टक्के किंवा ५० टक्के रक्कम ही क्लेम करता येते, जोवर ती एकूण उत्पन्नाच्या १० टक्के पर्यंत असते.

समजा ५ लाख रुपये कमावणारी व्यक्ती १.२० लाख रुपये डोनेशन देते. जर डोनेशनपैकी ५०% रक्कम इन्कम टॅक्स बेनिफिटसाठी पात्र असेल तर ती व्यक्ती 80G च्या लाभांखाली ६०,००० रुपयांचा क्लेम करेल. मात्र त्या व्यक्तीच्या एकूण उत्पन्नाच्या १०% रक्कम ५०,००० एवढीच होते. त्यामुळे ती व्यक्ती फक्त ५०,००० चाच क्लेम करू शकेल.

Comments are closed.