रिलायन्सला रिन्यूएबल एनर्जीची महासत्ता बनायला मदत करणार हे महारथी 

Reliance is betting big on renewable energy sector

रिलायन्स आता रिन्यूएबल एनर्जी सेक्टरमध्ये प्रवेश करणार हे आत्तापर्यंत सगळ्यांनाच ठाऊक आहे. मात्र रिलायन्स जेव्हा एखाद्या नवीन सेक्टरमध्ये उतरते तेव्हा कंपनी त्या सेक्टरची महासत्ता बनण्याच्या दिशेनेच प्रयत्न करते. जिओच्या उदाहरणावरून हे सगळ्यांना माहित आहेच. आता रिलायन्सला रिन्यूएबल एनर्जी सेक्टरमधील महासत्ता बवण्यासाठी मुकेश अंबानी यांनी जगातल्या आठ महारथींनाच पाचारण केले आहे. न्यू एनर्जी कौन्सिल अशा नावाची एक समितीच रिलायन्सने बनवली आहे. ही कौन्सिल रिलायन्सला या सेक्टरमध्ये व्यवसाय वाढवण्यासाठी सल्लागार म्हणून काम करणार आहे.

या परिषदेचे अध्यक्ष, जागतिक कीर्तीचे संशोधक रघुनाथ माशेलकर असतील. माशेलकर हे रिलायन्सचे इंडिपेन्डन्ट डायरेक्टर म्हणूनही काम करतात. माशेलकर यांच्या सोबतीला ऑस्ट्रेलियाच्या नॅशनल हायड्रोजन स्ट्रॅटेजीचे नेतृत्व करणारे आणि लो एमिशन टेक्नॉलॉजीसाठी तिथल्या सरकारचे विशेष सल्लागार असलेले अॅलन फिंकेल हे सुद्धा या कौन्सिलमध्ये असतील. तसेच ड्रेपर पारितोषिक विजेते रचिद याझमी, एमआयटीच्या एनर्जी इनिशिएटिव्हचे डायरेक्टर रॉबर्ट आर्मस्ट्राँग आणि ज्यांना फोटोव्होल्माटॅइक्सचे जनक म्हणून ओळखले वाजते ते मार्टिन ग्रीन यांचाही या कौन्सिलमध्ये समावेश असेल.

कौन्सिलमधील इतर सदस्यांत डेव्हिड मिल्स्टीन आहेत, ज्यांना हायड्रोजन,इनोव्हेटिव्ह एनर्जी स्टोरेज सिस्टीम आणि कार्बन कॅप्चरसाथीच्या संशोधनासाठी ओळखले जाते. लंडनच्या इम्पीरियल कॉलेजमधील एनर्जी इंजिनिअरिंगचे प्राध्यापक जेफ्री मैटलँड आणि मॉडर्न विंड इंडस्ट्रीचे उद्गाते हेनरिक स्टिसडल यांचाही यात समावेश असेल. स्वतः अंबानीही या कौन्सिलचे सदस्य असतील.

माशेलकर यांनी सांगितले की, “कौन्सिलच्या सदस्यांमध्ये सोलर, विंड, सीसीयूएस, पॉलिसी आणि ग्रीन टेक्नॉलॉजीमधील अधिकारी आणि जागतिक पातळीवरील तज्ज्ञ यांचा समावेश आहे. फक्त भारतातीलच नव्हे तर जगातील ऊर्जेच्या गरजा आणि रिन्यूएबल मार्केट यावर ह्या सगळे छाप पाडतील.”

आरआयएलचे जामनगर येथे जगातील सर्वात मोठे पेट्रोकेमिकल आणि रिफायनरी कॉम्प्लेक्स आहे आणि अलीकडेच दूरसंचार आणि रिटेलमध्ये राष्ट्रीय स्तरावरील व्यवसाय कंपनीने उभे केले. गेल्या वर्षभरामध्ये गूगल, फेसबुक आणि इतर गुंतवणूकदारांनी रिलायन्समध्ये २० बिलियन डॉलर्सपेक्षा जास्त पैसे गुंतवले आहेत.

चौसष्ट वर्षीय अंबानी हे कोणत्याही मोठ्या प्रकल्पाची सुरुवात करण्यापूर्वी आपल्या विचारांना आत्मसात आणि प्रमाणित करण्यासाठी शिक्षणतज्ज्ञ, शोधक आणि विचारवंत लोकांची मते लक्षात घेतात. कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले की, “रिलायन्सने आपल्या वाढीच्या प्रवासात अनेकदा वैश्विक विचारवंताची सल्लागार म्हणून निवड केली आहे.”

Comments are closed.