हेल्थ सेक्टर मधील दुसरा मोठा IPO होणार लाँच

Kedaara Capital backed Vijaya Diagnostic Center Ltd has fixed the price band for its initial public offer (IPO) at ₹522-531 a share.

केदारा कॅपिटल इक्विटी फर्म समर्थित विजया डायग्नोस्टिक सेंटर आपला आयपीओ 1 सप्टेंबर रोजी सबस्क्रिप्शनसाठी खुला करेल आणि हा इश्यू 3 सप्टेंबर रोजी बंद होईल.

या इश्यू द्वारे केदारा कॅपिटल आणि इतर प्रमोटर्सचे ३,५६,८८,०६४ शेअर्स विक्रीसाठी उपलब्ध होतील.

विजया डायग्नोस्टिक सेंटर ही २०२१ मध्ये आयपीओ लाँच करणारी दुसरी आरोग्य क्षेत्रातील कंपनी आहे. याअगोदर या महिन्याच्या सुरुवातीला कृष्णा डायग्नोस्टिक्सने आपल्या IPOद्वारे १,२१३.३३ कोटी रुपये उभारले होते.

डॉ एस सुरेंद्रनाथ रेड्डी ५०,९८,२९६ शेअर्सची विक्री करतील. गुंतवणूकदार काराकोरम हे २,९४,८७,२९० शेअर्सची तर केदारा कॅपिटल एआयएफ हे ११,०२,४७८ शेअर्सची विक्री करेल.

तर कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी १.५ लाख शेअर्स आरक्षित केले आहेत जे त्यांना अंतिम इश्यू किमतीच्या सवलतीत मिळू शकतात.

ऑफर ही कंपनीच्या ऑफ-पोस्ट पेड-अप इक्विटी शेअरच्या किमान 35 टक्के असेल.

प्रमोटर्स आणि प्रमोटर समूहाचे कंपनीमध्ये ५९.७८ टक्के शेअर्स आहे, ज्यात डॉ एस सुरेंद्रनाथ रेड्डी यांच्या ३७.७८ टक्के शेअरहोल्डिंगचा समावेश आहे.

केदारा कॅपिटल अल्टरनेटिव्ह इन्व्हेस्टमेंट फंड मध्ये केदारा कॅपिटल एआयएफ १ आणि काराकोरमचा अनुक्रमे १.४४ टक्के आणि ३८.५६ टक्के हिस्सा आहे.

विजया डायग्नोस्टिक सेंटर ही दक्षिण भारतातील सर्वात मोठी आरोग्य क्षेत्रातील कंपनी आहे आहे. कंपनी तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि कोलकाता मधील १३ शहरांमध्ये ८१ निदान केंद्र आणि ११ प्रयोगशाळांच्या नेटवर्कद्वारे पॅथॉलॉजी आणि रेडिओलॉजी चाचणी सेवांसाठी सुविधा ऑफर करते.

जून २०२१ आणि आर्थिक वर्ष २०२१ रोजी संपलेल्या तीन महिन्यांसाठी कंपनीने हैदराबाद आणि उर्वरित तेलंगणा व आंध्र प्रदेशातून अनुक्रमे ९५.९१ टक्के आणि ९६.२० टक्के महसूल मिळवला.

२०२१ मध्ये आयपीओचा बराच प्रभाव दिसला आहे. २०२० मध्ये ३११२८ कोटी रुपये कमाईच्या तुलनेत यावर्षी कंपन्यांनी ७१८३३.३७ कोटी रुपये उभारले आहेत.

अर्थव्यवस्थेतील पुनर्प्राप्ती आणि कोरोनाव्हायरसचे निर्बंध मागे घेतल्यामुळे तसेच सरकार आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने वाढीला चालना दिल्याने मार्केटला चालना मिळाली आहे.

Comments are closed.