तब्बल 25 मिलियन युरोचा व्यवहार, RIL चा सेमीकंडक्टर बाबतीत वाढता आलेख

NexWafe is a company that produces high-efficiency monocrystalline silicon wafers

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने 12 ऑक्टोबर रोजी सांगितले की, रिलायन्स न्यू एनर्जी सोलर लिमिटेडने जर्मनीच्या नेक्सवेफ जीएमबीएचचे नवीन शेअर्स खरेदी करण्यासाठी 25 मिलियन युरोची गुंतवणूक केली आहे.

RNESL ने नेक्सवेफ या मोनोक्रिस्टलाइन सिलिकॉन वेफर्सची निर्मिती करणाऱ्या कंपनीसोबत 86,887 शेअर्स 287.73 युरोमध्ये खरेदी करण्यासाठी करार केला आहे.

सिलिकॉन वेफर हे कंटेंट सेमीकंडक्टरच्या निर्मितीसाठी वापरले जाते, जे सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये आढळते.

नेक्सवेफ कच्च्या मालापासून तयार केलेले मोनोक्रिस्टलाइन सिलिकॉन वेफर्स उत्पादीत करते, ज्यामुळे बऱ्याच किचकट प्रक्रिया होत नाहीत.

आरआयएलने जाहीर केले की रिलायन्स न्यू एनर्जी सोलर लिमिटेड (आरएनईएसएल) ने हायड्रोजन इलेक्ट्रोलायझर्स विकसित आणि उत्पादन करण्यासाठी स्टायस्डल ए/एस सह पार्टनरशिप केली आहे .आरएनईएसएलला यासाठी परवाना देण्यात आला आहे, असे एक्स्चेंज फाइलिंगमध्ये म्हटले आहे.

स्टायस्डल ही एक डॅनिश कंपनी आहे, जी हवामान बदल कमी करण्यासाठी तंत्रज्ञान विकसित करते आणि त्याचे व्यापारीकरण करते.

2030 पर्यंत 100GW अक्षय ऊर्जा निर्माण करण्याचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी आरआयएलचे हे महत्त्वाचे पाऊल आहे.

10 ऑक्टोबर रोजी रिलायन्स न्यू एनर्जी सोलर लिमिटेड (आरएनईएसएल) ने नॉर्वे मुख्यालय असलेल्या आरईसी सोलर होल्डिंग्ज एएसचे (आरईसी ग्रुप) अधिग्रहण केले होते.

हेट्रोजनक्शन तंत्रज्ञानाच्या (एचजेटी) प्रवेशासह जागतिक स्तरावर फोटोव्होल्टिक (पीव्ही) उत्पादन प्लेअर बनण्यासाठी आरआयएलसाठी हे अधिग्रहण महत्त्वाचे आहे.

याशिवाय,आणखी एका करारात, RNESL ने 10 ऑक्टोबर रोजी म्हटले की, ते स्टर्लिंग आणि विल्सन सोलर लिमिटेड (SWSL) चा 40 टक्के स्टेक विकत घेतील.

मंगळवारी रिलायन्स इंडस्ट्रीज (RIL) चा शेअर BSE वर 0.66 टक्क्यांनी वाढून 2,668.55 रुपयांवर बंद झाला.

Comments are closed.