EV थीम वर बेट लावत असाल तर ह्या स्टॉक कडे दुर्लक्ष करू नका…
Precision Wires India Limited is all set to be benefitted by growing copper demand
प्रिसिजन वायर (Precision Wire)
वाइंडिंग वायरचे भारतातील सर्वाधिक प्रॉडक्शन करणारी कंपनी
प्रॉडक्टस –
– एनॅमल्ड राऊंड वाइंडिंग वायर्स
– एनॅमल्ड रेक्टँग्युलर वाइंडिंग वायर्स
– कंटिन्यूअसली ट्रान्सपोज्ड कंडक्टर
– पेपर इन्स्युलेटेड कॉपर कंडक्टर
४ मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी
१८ हून अधिक देशांमध्ये कस्टमर्स
४५,००० मेट्रिक टन वार्षिक प्रॉडक्शन कॅपॅसिटी
भेल, एबीबी, भारत बिजली, बॉश, कमिन्स, डेंसो, इमर्सन, गोदरेज, जीई, सिमेन्स, व्हॅलिओ यासारखे नावाजलेले कस्टमर्स
३ नोव्हेंबर २०२१ रोजी कंपनी आपले सप्टेंबर तिमाहीचे निकाल जाहीर करणार आहे. याच मिटिंगमध्ये कंपनी शेअर स्प्लिटच्या प्रस्तावावरसुद्धा विचार करणार आहे. कंपनी सातत्याने डिव्हीडंड देत आहे. कंपनीने फेब्रुवारी २०२१ मध्ये सध्याची मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी अद्ययावत करण्यासाठी २५ कोटी रुपयांच्या कॅपेक्सला मान्यता दिली. जून २०२१ रोजी संपलेल्या तिमाहीत कंपनीने ११.५७ कोटी रुपये नफा कमावला. हा नफा मार्च २०२१ च्या तिमाहीत १६.६९ कोटी रुपये इतका होता.
कंपनीचे प्रॉडक्ट अतिशय बेसिक असले तरी इन्फ्रास्ट्रक्चर, ऑटोमोटिव्ह, ऍग्रीकल्चर, रेल्वे, इलेक्ट्रॉनिक्स अशा विविध क्षेत्रांमध्ये वापरले जातात. भारतातील कॉपर वायर इंडस्ट्री त्यामानाने बर्यापॆकी अनऑर्गनाइज्ड आहे. या इंडस्ट्रीमध्ये वायर बनवणारे छोटेमोठे जवळपास ५०० प्लेयर्स आहेत. नेमका याचाच फायदा प्रिसिजनला होतोय. या क्षेत्रातील निवडक ऑर्गनाइज्ड प्लेयर्समध्ये प्रिसिजन ही सगळ्यात मोठी कंपनी आहे. येणाऱ्या काळात वाढत जाणारे पॉवर कंझम्पशन, ईव्हीची वाढती मागणी या सगळ्या बाबींचा कंपनीच्या बिझनेवसवर सकारात्मक परिणाम होतो आहे.
ईव्हीची वाढती मागणी प्रिसिजनला फायद्याची का?
१. कॉपर हा ईव्हीमध्ये वापरला जाणारा महत्वाचा घटक आहे.
२. एका ईव्हीमध्ये साधारणपणे १ मैल अंतराची कॉपर वायर वापरली जाऊ शकते. त्यामुळे ईव्ही मॅन्युफॅक्चरिंग असो वा चार्जिंग स्टेशन बनवणे, तिथे कॉपर वायर तर लागणारच आहे. त्यामुळे प्रिसिजनला त्याचा फायदाच होईल.
टेक्निकल ॲनालिसिस
स्टॉक २०२० पासून H-H आणि H-L बनवत आहे. स्टॉक ५२ विक हाय जवळ असून त्याला याच झोन मध्ये चांगला रेझिस्टन्स आहे. हा झोन जर स्टॉकने क्लिअर केला तर अजून चांगली मुव्ह पहायला मिळेल.
Comments are closed.