सॉव्हरिन गोल्ड बॉण्ड्सची नवी सिरीज आली, सगळी माहिती वाचा एकाच ठिकाणी 

The SGB will be open for 5 days from August 30 to September 3, 2021 at Rs 4,732 per bond

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून जरी केल्या जाणाऱ्या सॉव्हरिन गोल्ड बॉण्ड्सची सहावी सिरीज ३० ऑगस्ट २०२१ पासून खुला केला जाईल. एसजीबी हे ३० ऑगस्ट ते ३ सप्टेंबर २०२१ दरम्यान ५ दिवसांसाठी खुले राहील. तर बॉण्डचे प्रमाणपत्र ७ सप्टेंबर रोजी जारी केले जाईल.

एसजीबी म्हणजे काय?
एसजीबी हे सोन्याला पर्याय मानले जाते. यासाठी RBI भारत सरकारच्या वतीने हा बॉण्ड जारी करते ज्याची मोजणी ग्रॅम्समध्ये केली जाते.

ऑफर काय आहे?
आरबीआयने SGB स्कीम द्वारे, सहाव्या सीरिजसाठी प्रति ग्रॅम सोन्याची इश्यू किंमत ४७३२ रुपये  ठेवली आहे. ज्या किमतीवर बॉण्ड्स ऑफर केले जात आहेत ती किंमत सेकंडरी मार्केटमधील किंमतीच्या अगदी जवळची आहे.

“सोन्यात गुंतवणूक करण्याचा विचार करत आहात? SGB मध्ये गुंतवणूक करण्याची 6 कारणे येथे आहेत. एसबीआयचे ग्राहक, http://onlinesbi.com वर ई-सेवांअंतर्गत या बाँडमध्ये गुंतवणूक करू शकतात, ”असे स्टेट बँकेने ट्विट केले आहे.

SGB वर डिस्काउंट काय आहे ?
आरबीआयने २७ ऑगस्ट रोजी म्हटले होते की, ऑनलाईन अर्ज करणाऱ्या गुंतवणूकदारांना आणि जेथे पेमेंट डिजिटल पद्धतीने केले जाते त्यांना नाममात्र मूल्यावर प्रति ग्रॅम ५० रुपये सूट दिली जाईल. “अशा गुंतवणूकदारांसाठी, गोल्ड बाँडची इश्यू किंमत ४६८२ रुपये प्रति ग्रॅम असेल,” असे आरबीआयने म्हटले आहे.

एसजीबीचे फायदे
रेडेंप्शन किंवा प्रीमॅच्युर रेडेंप्शन वेळी, गुंतवणूकदाराला त्याने भरलेल्या सोन्याच्या किंमतीसाठी चालू बाजारभाव प्राप्त होतो. त्यामुळे गुंतवणूक सुरक्षित राहते. तसेच, दागिन्यांच्या बाबतीत लागणारे विविध शुल्क, आणि शुद्धता यासारख्या समस्यांपासून एसजीबी मुक्त आहे. या व्यतिरिक्त, एसजीबी डिमॅट  स्वरूपात ठेवल्या जातात ज्यामुळे स्क्रिप गमावण्याचा धोका दूर होतो.

कोण गुंतवणूक करू शकतो?
अ) भारतीय नागरिक ब) हिंदू अविभाजित कुटुंबे (HUFs), ट्रस्ट, विद्यापीठे आणि धर्मादाय संस्था.
क) अल्पवयीन गुंतवणूकदार एसजीबीमध्ये गुंतवणूक करू शकतो, मात्र पालकांनी पाल्याच्या वतीने अर्ज करावा.

एसजीबी विकण्यासाठी अधिकृत एजन्सीज
राष्ट्रीयकृत बँका, शेड्युल खाजगी बँका, शेड्युल विदेशी बँका, नियुक्त पोस्ट ऑफिस, स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (SHCIL) आणि अधिकृत स्टॉक एक्स्चेंजची कार्यालये.

गुंतवणुकीची किमान आणि कमाल मर्यादा
एसजीबी मध्ये वैयक्तीक पातळीवर किमान गुंतवणूक एक ग्रॅम आहे तर कमाल ४ किलो आहे. HUF साठी ४ किलो आणि तर २० किलो ही ट्रस्ट आणि इतर गुंतवणूक घटकांसाठी जास्तीत जास्त सबस्क्रिप्शनची मर्यादा आहे जी सरकारने एप्रिल ते मार्च या कालावधीत वेळोवेळी अधिसूचित केली आहे.

SGB वर दिले जाणारे व्याज दर
एसजीबी सुरुवातीच्या गुंतवणूकीच्या रकमेवर दरवर्षी २.५०% टक्के दराने व्याज देतात.

कर भरणा
आयकर अधिनियम, १९६१ मधील तरतुदींनुसार, एसजीबीवरील व्याज हे करपात्र असेल, तर एखाद्या व्यक्तीला एसजीबीच्या पूर्ततेवर मिळणाऱ्या नफ्यात मात्र कर सूट देण्यात आली आहे. तथापि, बॉण्डवर टीडीएस लागू केला जाणार नाही.

SGB चा मागील इश्यू
आरबीआयने जारी केलेला एसजीबीचा मागील आणि पाचवा टप्पा ९ ऑगस्ट २०२१ रोजी खुला केला गेला होता आणि १३ ऑगस्ट २०२१ रोजी बंद झाला. त्याची किंमत प्रति बॉण्ड ४७९० रुपये ठेवण्यात आली होती आणि १७ ऑगस्ट २०२१ रोजी तो बॉण्ड जारी करण्यात आला होता

Comments are closed.