जिथं बघावं तिथं वाढतोय टाटांचा वाटा, तुमच्याकडे आहेत का हे शेअर?

Tata Sons is slowly growing its holding in group companies

भारतात नावाजलेली आणि गुंतवणूक विश्वात स्वतःच स्थान अबाधित ठेवणारी, टाटा सन्सने आर्थिक वर्ष २०२१ दरम्यान टाटा कम्युनिकेशन्स, टाटा मोटर्स आणि एअर एशिया इंडिया या युनिट्समध्ये आपली हिस्सेदारी वाढवली आहे. कंपनीचे चेअरमन चंद्रशेखरन यांनी कंपनीच्या वार्षिक सभेत बोलताना सांगितले की,कंपनीने भविष्यातील संधीचा फायदा घेण्यासाठी आणि सध्याच्या व्यवसायांमध्ये गुंतवणुक वाढवण्यासाठी या कंपन्यांमधील आपला वाटा वाढवला आहे.

या कंपन्यांच्या शेअरहोल्डिंगमध्ये झाली वाढ –
भारत सरकारच्या ऑफर फॉर सेलच्या (OFS) सबस्क्रिप्शनद्वारे कंपनीची उपकंपनी पॅनाटोन फिनवेस्टच्या माध्यमातून टाटा कम्युनिकेशन्समधील शेअरहोल्डिंग ५८. ८६ टक्क्यांपर्यंत वाढली आहे.

तर, एअर एशिया इंडिया मध्ये, एअर एशिया बेरहार्डकडून अतिरिक्त स्टेक खरेदी करून शेअरहोल्डिंग ५१ टक्क्यांवरून ८३.६७ टक्क्यांवर आली आहे.

शेअर्सच्या प्रायमरी इश्यूद्वारे टाटा मोटर्समधील शेअर होल्डिंग ३९. ५२ टक्क्यांवरून ४३. ७३ टक्क्यावर आली. खुल्या बाजारातील खरेदीद्वारे डिफरेंशियल व्होटिंग राईट (डीव्हीआर) शेअर्समधील स्टेक ५. २६ टक्क्यांवरून ७.५७ टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आला आहे.

शेअर्सच्या प्रायमरी इश्यूद्वारे टाटा पॉवरमधील शेअर होल्डिंग ३५. २७ टक्क्यांवरून ४५. २१ टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आली आहे. खुल्या बाजारातील खरेदीद्वारे टाटा केमिकल्समधील शेअरहोल्डिंग २८.५१ टक्क्यांवरून ३१.९० टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आल्याचे चंद्रशेखरन यांनी सांगितले.

आर्थिक वर्ष २०२१ दरम्यान, टाटा सन्सने भविष्यातील फायद्यासाठी मॅन्युफॅक्चरिंग,  सर्व्हिसेस, आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवर नवीन व्यवसायांमध्ये गुंतवणूक केली आहे. नवीन गुंतवणूकींमध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्स (प्रिसिजन इंजिनिअरिंग आणि मॅनुफॅक्चरींग ऑपरेशन्स), टाटा मेडिकल आणि डायग्नोस्टिक्स (आधुनिक वैद्यकीय उपकरणे आणि रुग्ण केंद्रित उपाय प्रदान करण्यासाठी) आणि टाटा डिजिटल (ग्राहक-केंद्रित डिजिटल व्यवसाय तयार करण्यासाठी) यांचा समावेश आहे.

Comments are closed.