सप्टेंबरमध्ये येणाऱ्या आयपीओंच्या किंमतीत होणार का फेरबदल?

Get ready for September fest of IPOs

सध्या आयपीओचा ट्रेंड भारतीय बाजारपेठेत धुमाकूळ घालत आहे, बऱ्याच कंपन्यांनी या वर्षात आयपीओ आणले आहेत तर अजून बऱ्याच कंपन्या आयपीओ आणण्याची तयारी करत आहेत.

ऑगस्ट प्रमाणेच सप्टेंबर महिन्यात देखिल कंपन्या प्राथमिक बाजारपेठेत व्यस्त राहण्याची अपेक्षा आहे कारण अनेक पब्लिक इश्यू तयारीत आहेत. यावर तज्ञांना वाटते की आता कंपन्यांना त्यांच्या आयपीओ मधील किंमतींवर पुन्हा काम करावे लागेल.

सप्टेंबर मध्ये लाँच होणाऱ्या IPO ची यादी मोठी आहे. डायग्नोस्टिक चेन ऑपरेटर विजया डायग्नोस्टिक सेंटर आणि स्पेशॅलिटी केमिकल कंपनी ॲमी ऑरगॅनिक्सने आधीच जाहीर केले आहे की त्यांचे आयपीओ १ सप्टेंबरला उघडतील आणि ३ सप्टेंबरला बंद होतील. ते अनुक्रमे १,८९५ कोटी आणि ५७० कोटी रुपये उभारण्याची योजना आखत आहेत.

तज्ञांच्या मते, ऑगस्टमध्ये १८,२००० कोटी रुपयांच्या तुलनेत, सप्टेंबरमध्ये आयपीओद्वारे एकूण निधी उभारणी १०,००० कोटी रुपयांपर्यंत असू शकते.

स्वस्तिक इन्व्हेस्टमार्टचे संशोधन प्रमुख संतोष मीणा म्हणाले, “आयपीओची गती ही सेकंडरी मार्केटच्या वर्तनावर अवलंबून असते आणि असे मानले जात आहे की या वर्षी ती पीक वर जाण्याची शक्यता आहे. आम्ही प्रायमरी मार्केट बाबत अशी अपेक्षा करत आहोत की ते २०२१ मध्ये IPO मध्ये व्यस्त राहिल.

१०,००० कोटी हून अधिक किंमत असणारे IPO

मेहता इक्विटीजचे व्हीपी रिसर्च प्रशांत तापसे म्हणाले, “अपेक्षित आयपीओ पैकी ६-८ आयपीओ सप्टेंबर २०२१ मध्ये खुले करता येतील”. तर कॅपिटलव्हीया ग्लोबल रिसर्चचे प्रमुख रिसर्च गौरव गर्ग यांच्यामते १०,००० कोटींपेक्षा जास्त किमतीचे सुमारे १० आयपीओ सप्टेंबरमध्ये दलाल स्ट्रीटवर येण्याची शक्यता आहे.

आदित्य बिर्ला सन लाइफ एएमसी, फिनकेअर स्मॉल फायनान्स बँक, बजाज एनर्जी, गोफर्स्ट (पूर्वीचे गोएअर), स्टड्स ॲक्सेसरीज, सुप्रिया लाइफसायन्स, पेन्ना सिमेंट इंडस्ट्रीज, उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक, आधार हाऊसिंग फायनान्स, जना स्मॉल फायनान्स बँक, ईएसएएफ स्मॉल फायनान्स बँक, पारस डिफेन्स आणि स्पेस टेक्नॉलॉजी, सेव्हन आयलंड शिपिंग आणि श्रीराम प्रॉपर्टीज यांना त्यांच्या आयपीओसाठी आधीच मंजुरी मिळाली आहे.

विजया डायग्नोस्टिक सेंटर आणि अमी ऑर्गेनिक्स व्यतिरिक्त, ६-८ आयपीओ या सूचीमधून असू शकतात. वन ९७ कम्युनिकेशन्स (पेटीएम) आणि मोबिक्विक देखील लाइनमध्ये आहेत परंतु त्यांना अद्याप सेबीची मंजुरी मिळालेली नाही.

ऑगस्ट मध्ये प्रायमरी इश्यू मोठ्या प्रमाणात उपलब्ध होते कारण आठ पब्लिक इश्यू दलाल स्ट्रीटवर आणि १० स्टॉक शेअर बाजारात सूचीबद्ध होते, तज्ञांना असे वाटते की आयपीओ सुरू करण्यापूर्वी कंपन्या आणि मर्चंट बँकर्सना त्याच्या किंमतीवर काम करावे लागेल.

मेहता इक्विटीज चे व्हीपी रिसर्च, प्रशांत तापसे म्हणाले, “एकूणच बाजारातील घडामोडी सावध आहेत आणि गुंतवणूकदारांकडून चांगला प्रतिसाद असूनही प्राथमिक मुद्द्यांमध्ये तेच प्रतिबिंबित केले जात आहे. कारट्रेड, कृष्णा डायग्नोस्टिक, अप्टस व्हॅल्यू हाउसिंग आणि सेलऑफ पोस्ट लिस्टिंगची कमकुवत सूची आयपीओ फेवर कमी करते.” येणाऱ्या आयपीओ वर त्यांचा विश्वास आहे, मर्चंट बँकर्स आणि प्रमोटर्स ना अपेक्षित मूल्यांकनावर पुन्हा काम करावे लागेल.

ऑगस्टमध्ये ॲप्टस व्हॅल्यू हाऊसिंग फायनान्स, चेम्प्लास्ट सनमार, विंडलास बायोटेक, कारट्रेड टेक आणि नुवोको विस्टास कॉर्पोरेशनने शेअर बाजारांवर कमकुवत सुरुवात केली होती पण आता नुवोको विस्टास कॉर्पोरेशन, कारट्रेड टेक, विंडलास बायोटेक यांनी इश्यू किंमतीत लक्षणीय सूट दिली आहे.

स्वस्तिक इन्व्हेस्टमार्टचे संतोष मीना म्हणाले, “आम्ही नुकतेच आलेल्या IPO साठी उपलब्ध बेंचमार्क पाहत आहोत, आणि मला वाटते की हा कालावधी बाजारपेठेसाठी फायदेकारक आहे. मला विश्वास आहे की बाजार त्याच आयपीओला ट्रेंड करत राहील जे मूलभूतपणे चांगले असतील”.

बीएसई सेन्सेक्स आणि निफ्टी ५० ने ३१ ऑगस्ट रोजी अनुक्रमे ५७,५५२.३९ आणि १७१३२.२० च्या नवीन विक्रमी उच्चांकावर पोहोचले, महिन्यामध्ये आतापर्यंत सुमारे ७ टक्के यात वाढ झाली आहे.

Comments are closed.