स्पेशालिटी केमिकल फर्म एथर लवकरच आणू शकते IPO, उभारणार ‘इतके’ कोटी

स्पेशॅलिटी केमिकल कंपनी एथर इंडस्ट्रीजने पुढील आठवड्यात 1,000 कोटी रुपयांच्या IPO साठी प्राथमिक कागदपत्रे दाखल करण्याची योजना आखली आहे.

स्पेशॅलिटी केमिकल कंपनी एथर इंडस्ट्रीजने पुढील आठवड्यात 1,000 कोटी रुपयांच्या IPO साठी प्राथमिक कागदपत्रे दाखल करण्याची योजना आखली आहे.

पब्लिक इश्यूवर कंपनीला सल्ला देण्यासाठी कोटक महिंद्रा कॅपिटल कंपनी लिमिटेड आणि एचडीएफसी बँक लिमिटेड यांची मर्चंट बँकर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

एथर इंडस्ट्रीजने 2013 मध्ये एका R&D युनिटसह सुरुवात केली आणि 2017 मध्ये व्यावसायिक उत्पादन सुरू केले. कंपनी फार्मास्युटिकल, अॅग्रोकेमिकल, मटेरियल सायन्स, इलेक्ट्रॉनिक केमिकल, उच्च कार्यक्षमता फोटोग्राफी आणि तेल आणि वायू उद्योग विभागांत काम करते.

सध्या, कंपनीची क्षमता 4,000 मेट्रिक टन पेक्षा जास्त आहे. कंपनीने अलीकडेच व्हाईट ओक कॅपिटल आणि आयआयएफएलकडून प्री-आयपीओ राऊंडमध्ये 100 कोटी रुपयांहून अधिक निधी उभारला आहे.

कंपनीचा ऑपरेटिंग रेव्हेन्यू FY21 मध्ये वाढून 450.23 कोटी झाला, जो FY20 मध्ये 301.87 कोटी होता. कंपनीचा नेट प्रॉफिट FY20 मध्ये 39.6 कोटींवरून FY21 मध्ये 75 टक्क्यांनी वाढून 71 कोटींवर पोहोचला.

सूत्रांनुसार कंपनीने IPO द्वारे 800-1,000 कोटी रुपये उभारण्याची योजना अंतिम केली आहे आणि पुढील आठवड्यात सेबीकडे DRHP दाखल करण्याची अपेक्षा आहे.

Comments are closed.