पहिल्या दिवशी स्टार हेल्थ IPO साठी मिळाले ‘इतके’ सबस्क्रिप्शन – वाचा एका क्लिकवर
स्टार हेल्थ अँड अलाईड इन्शुरन्स कंपनीचा IPO आज सबस्क्रिप्शनसाठी उघडला आहे. 2 डिसेंबर ही IPO साठी अखेरची तारीख असेल. पब्लिक ऑफरसाठी प्राइस बँड 870-900 रू प्रति शेअर सेट केला गेला आहे . स्टार हेल्थने सोमवारी सांगितले की, त्यांनी आपल्या IPO च्या आधी अँकर गुंतवणूकदारांकडून 3,217 कोटी उभे केले आहेत.

बिडिंगच्या पहिल्या दिवसाअखेर, स्टार हेल्थ IPO ०.१२ वेळा सबस्क्राइब झाला आहे आणि रिटेल गुंतवणूकदार श्रेणी ०.६४ वेळा बुक झाली आहे.
स्टार हेल्थच्या IPO मध्ये 2,000 कोटीच्या इक्विटी शेअर्सचा फ्रेश इश्यू तसेच प्रमोटी आणि विद्यमान स्टेकहोल्डरद्वारे 58,324,225 इक्विटी शेअर्सच्या विक्रीची ऑफर समाविष्ट आहे.
तज्ञाच्या मते, ग्रे मार्केटमध्ये स्टार हेल्थ शेअर्स प्रीमियम (GMP) 10 रू पर्यंत घसरला आहे. कंपनी 10 डिसेंबर रोजी आघाडीच्या स्टॉक एक्सचेंज BSE आणि NSE वर लिस्टिंग करण्याची योजना आखत आहे.
स्टार हेल्थ, देशातील आघाडीची खाजगी आरोग्य विमा कंपनी आहे. कंपनीत वेस्टब्रिज कॅपिटल आणि राकेश झुनझुनवाला यांसारख्या गुंतवणूकदारच हिस्सा आहे.
Comments are closed.