सुप्रिया लाइफसायन्सची धमाकेदार लिस्टिंग! ‘इतक्या’ प्रीमियमवर झाली लिस्टिंग
फार्मा कंपनी सुप्रिया लाइफसायन्सने 28 डिसेंबर 55.11 टक्के प्रीमियमसह लिस्टिंग केली. BSE वर 274 रुपयांच्या इश्यू किमतीच्या तुलनेत शेअर 425 रुपयांवर उघडला, तर नॅशनल स्टॉक एक्स्चेंजमध्ये शेअर्सची सुरुवातीची किंमत 421 रुपये होती.

फर्मच्या ऑफरला गुंतवणूकदारांकडून मोठी मागणी मिळाली, कारण ऑफर 16-20 डिसेंबर दरम्यान 71.51 पट सबस्क्राईब केली गेली.
IPO मध्ये गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांनी जास्तीत जास्त बोली लावल्या होत्या, कारण त्यांचा राखीव भाग 161.22 वेळा सबस्क्राइब झाला होता. रिटेल गुंतवणूकदारांसाठी बाजूला ठेवलेला भाग 56.01 वेळा बुक केला गेला आणि पात्र संस्थात्मक खरेदीदारांनी 31.83 वेळा सबस्क्रिप्शन घेतल.
सुप्रिया लाइफसायन्सने इश्यूद्वारे 700 कोटी रुपये जमवले आहेत, ज्याची किंमत प्रति इक्विटी शेअर 265-274 रुपये होती.
Comments are closed.