‘या’ बहुप्रतिक्षित IPO ची लिस्टिंग होणार उद्या, ग्रे मार्केटमधील स्टेटस वाचा एका क्लिकवर

यादरम्यान कंपनीचा IPO ग्रे मार्केटमध्ये दाखल झाला आहे. IPO वॉच आणि IPO सेंट्रल नुसार ग्रे मार्केटमध्ये शेअर 160 ते 170 च्या प्रीमियमसह 822 ते 832 रुपयांच्या प्रीमियमवर ट्रेड करत होता.

भारतीय लॅबवेअर कंपनी Tarsons Products उद्या, 26 नोव्हेंबर रोजी स्टॉक एक्स्चेंजवर IPO लिस्टिंग करण्यासाठी सज्ज आहे.

कंपनीच्या IPO ला गुंतवणूकदारांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. सदर IPO 77.79 वेळा सबस्क्राईब केला गेला आहे. कंपनी IPO द्वारे 1,024 कोटी उभारण्याचा विचार करत आहे. यात 150 कोटींचा फ्रेश इश्यू देखील उपलब्ध आहे.

यादरम्यान कंपनीचा IPO ग्रे मार्केटमध्ये दाखल झाला आहे. IPO वॉच आणि IPO सेंट्रल नुसार ग्रे मार्केटमध्ये शेअर 160 ते 170 च्या प्रीमियमसह 822 ते 832 रुपयांच्या प्रीमियमवर ट्रेड करत होता.

IPO मध्ये 150 कोटी किमतीच्या इक्विटी शेअर्सचा फ्रेश इश्यू आणि 1.32 कोटी इक्विटी शेअर्सचे ऑफर फॉर सेल (OFS) उपलब्ध आहेत.

कंपनीच्या क्लायंटमध्ये डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज, मेट्रोपोलिस हेल्थकेअर, डॉ. लाल पाथ लॅब यांचा समावेश आहे.

Tarsons Products ही संशोधन संस्था, शैक्षणिक संस्था, फार्मास्युटिकल कंपन्या, डायग्नोस्टिक्स कंपन्या आणि हॉस्पिटलमधील प्रयोगशाळांमध्ये वापरल्या जाणार्‍या दर्जेदार लॅबवेअर उत्पादनांच्या विविध श्रेणींचे डिझाइन, विकास, उत्पादन आणि पुरवठा करण्यात गुंतलेली कंपनी आहे.

Comments are closed.