भारतीय कंपन्यांसाठी चांगली बातमी – सेमी कंडक्टर मार्केटमध्ये थेट टाटा घेणार एंट्री

Tata Group is set to enter in semiconductor manufacturing

टाटा समूहाचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांनी ९ ऑगस्ट रोजी झालेल्या बैठकीत टाटा लवकरच सेमीकंडक्टर निर्मितीमध्ये भाग घेण्याची योजना आखत असल्याचे सांगितले. आयएमसी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीच्या एजीएममध्ये बोलताना त्यांनी ही माहिती दिली.

टाटा समूहाच्या सेमीकंडक्टर निर्मितीमध्ये येण्याची प्रमुख 8 कारणे खालीप्रमाणे आहेत,

१ – सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग प्रक्रियेमध्ये आपण रोजच्या वापरात जी उपकरणे वापरतो त्यासाठी लागणारे चीपसेट आणि इतर मेटल ऑक्साईड सेमीकंडक्टर (एमओएस) डिव्हाइसेसची निर्मिती करणे याचा समावेश असतो.

२ – चंद्रशेखरन म्हणाले की, टाटा समूहाने याअगोदरच इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन, ५ जी नेटवर्क उपकरणे तसेच सेमीकंडक्टर्स सारख्या अनेक नवीन व्यवसायांमध्ये प्रवेश केला आहे. परंतू त्यांनी टाटा ग्रुप नेमकी कोणती योजना आखत आहे हे अद्याप स्पष्ट केलेले नाही.

३ – हाय टेक इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे उत्पादन करण्याची बाजारपेठ जवळपास १ ट्रिलियन डॉलर्स एवढी आहे असे चंद्रशेखरन यांनी सांगितले. हे करताना बाकी जागतिक बाजारपेठ चीनवर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहेत. मात्र कोव्हिड नंतर जागतिक बाजारपेठ यासाठी दुसरा पर्याय शोधत आहेत. त्यामुळेच भारतासाठी एक मोठी संधी निर्माण झाली आहे.

४ – ते म्हणाले की, ” सध्या होत असलेल्या राजकीय बदलांमुळे भारताला लक्षणीय फायदा होऊ शकतो”.

५ – टाटा ग्रुप मध्ये आम्ही इलेक्ट्रॉनिक उपकरणांची हाय टेक मॅन्युफॅक्चरींग, त्याची प्रिसिजन मॅन्युफॅक्चरींग, असेम्ब्ली टेस्टिंग आणि सेमीकंडक्टरचे उत्पादन याची सुरूवात केली आहे. लवकरच मार्केट मधील बिझनेसमध्ये आम्ही टाटा चे वेगळे स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करणार आहोत.

६ – ही घोषणा अशा वेळी करण्यात आली आहे जेव्हा जगातील सर्वात मोठ्या चिप उत्पादकांनी असा इशारा दिला आहे की २०२२ पर्यंत चिप्सची कमतरता जाणवत राहील. कोरोनाव्हायरस साथीच्या रोगामुळे जगभरातील सेमीकंडक्टर पुरवठ्यावर यामुळे एक प्रकारे ताण आला आहे.

७ – चिप हा कोणत्याही इलेक्ट्रॉनिक गॅझेटचा एक आवश्यक घटक आहे, ज्यामध्ये लाखो ट्रान्झिस्टर आणि रेझिस्टर चा समावेश यात होतो. काळानुरूप याची उत्पादन प्रक्रिया अधिकाधिक गुंतागुंतीची होत गेलेली आहे.

८ – तैवान हा जगात सर्वाधिक सेमीकंडक्टर बनवणारा देश आहे. सेमीकंडक्टरच्या बाजारपेठेत या देशाचा वाटा ५० टक्क्यांहून अधिक आहे. तैवान सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग कंपनी (टीएसएमसी) ही जगातील अव्वल चिप-निर्माता आहे. जी अँपल, एएमडी, एनव्हीडिया, मीडियाटेक, क्वालकॉम आणि इतरही बर्‍याच कंपन्यांसाठी चिप्स बनवते आणि त्यांना पुरवते.

Comments are closed.