एथर एनर्जीचा मोठा निर्णय – इतर कंपन्यांना केले स्वतःचे पेटंट खुले!

Ather Energy to open its proprietary fast charging connector to other EV makers

इलेक्ट्रिक स्कूटर उत्पादक कंपनी एथर एनर्जीने आज एक मोठा निर्णय जाहीर केला. ईव्ही गाड्या बनवणाऱ्या इतर कंपन्यांना एथर आता त्यांचे फास्ट-चार्जिंग कनेक्टर तंत्रज्ञान उपलब्ध करून देणार आहे. याबाबत एथर एनर्जीचे सीईओ तरुण मेहता यांनी ट्विट करत माहिती दिली आहे.

एथरच्या या निर्णयामुळे देशातील इंटरऑपरेबल टू-व्हीलर फास्ट चार्जिंग प्लॅटफॉर्मचा मार्ग मोकळा होईल. यामुळे एथरने इन्स्टॉल केलेले २०० फास्ट चार्जर्स इतर कंपन्यांच्या गाड्यांसाठीसुद्धा वापरता येतील. तसेच इतर OEMs ना एक कॉमन स्टॅंडर्ड वापरणे सुलभ होईल आणि त्यासाठी लागणारी पायाभूत गुंतवणूक कमी होईल, असे कंपनीने एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

एथरने डिझाइन केलेल्या, कनेक्टरमध्ये कॉम्बो एसी आणि डीसी चार्जिंग आहे. कंपनीच्या माहितीनुसार त्याची साईझ दुचाकी आणि तीनचाकीला योग्य ठरेल अशी ठेवण्यात आली आहे.
शिवाय, कंपनीने कनेक्टर कमी किंमतीत तयार करता येतील असे बनवले आहेत जेणेकरून या सेगमेंटमधील अधिकाधिक गाड्यांमध्ये त्याचा वापर होऊ शकेल.

एथर एनर्जीने फास्ट-चार्जिंग नेटवर्क, एथर ग्रिड तयार करण्यासाठी गुंतवणूक केली आहे. तसेच सर्व इलेक्ट्रिक दुचाकी आणि चारचाकी वाहनांना एकच स्पीड चार्ज पर्याय उपलब्ध करून दिला आहे.

एक मजबूत चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर हे इलेक्ट्रिक दुचाकींना आकर्षित करण्याचे एक प्रमुख साधन आहे, कंपनीने असेही म्हटले आहे की, चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चरचा जास्तीत जास्त वापर आणि कार्यक्षमता वाढवण्यासाठी, एकच कनेक्टर असणे आवश्यक आहे जे सगळ्या गाड्यांमध्ये वापरले जाऊ शकतात.

अथर एनर्जीच्या मते, इलेक्ट्रिक चारचाकींसाठी चॅडेमो, सीसीएस सारखे जागतिक स्टॅंडर्ड असताना, चीन वगळता इतर कुठेही दुचाकी चार्जिंग कानेक्टरसाठी आवश्यक कोणतेही स्टॅंडर्ड नाही.

दुचाकींसाठी वेगवान चार्जिंग आवश्यकता गरजेचे आहे आणि ह्या गाड्यांच्या आकारामुळे चारचाकीचा चार्जिंग कनेक्टर दुचाकीला वापरणे अशक्य होते. यावर, एकच कनेक्टर असणे हा उपाय असून तोच फास्ट चार्जिंगसाठी वापरला जाईल.

“इलेक्ट्रिक दुचाकी आता सरकारद्वारे FAME 2 च्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर मुख्य प्रवाहात येत आहेत. ही शिफ्ट करण्यासाठी ग्राहकांना सार्वजनिक ठिकाणी फास्ट-चार्जिंग नेटवर्कची आवश्यकता आहे आणि हे तयार करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत.” असेही तरुण मेहता म्हणाले.

Comments are closed.