आयफोन चाहत्यांसाठी मोठी बातमी – Apple iPhone 13 मध्ये असणार पोर्ट्रेट व्हिडिओ मोड, ProRes रेकॉर्डिंग!

New Iphone 13 may add some new features to make this device stand out.

Apple पुढच्या महिन्यात आयफोन 13 लॉन्च करण्याची तयारी करत आहे. iPhone13 मधील फीचर्स बद्दल अजून कंपनीकडून गुप्तता पाळण्यात अली असली तरी,काही माहिती लीक झाली आहे.  iPhone13 मधील तीन नवीन फीचर्स लीक झाली असून, यामध्ये व्हिडिओसाठी ProRes, पोर्ट्रेट मोड आणि फोटोजसाठी फिल्टरसारखी प्रणाली वापरली आहे.

ब्लूमबर्गच्या मार्क गुर्मन यांच्यामते, कंपनी आयफोनमध्ये व्हिडिओंसाठी ProRes आणि पोर्ट्रेट मोड सारखी नवीन फीचर्स आणणार आहे. कंपनीने आयफोन 7 प्लसला पोर्ट्रेट मोड प्रथम दिला होता. आता या वर्षी, iOS15  मध्ये फेसटाइमलासुद्धा पोर्ट्रेट मोड उपलब्ध करून देण्यात येईल.

आगामी आयफोनसाठी, Apple याच फीचर्सचा वापर करून व्हिडिओमध्ये पोर्ट्रेट मोड आणण्यासाठी योजना आखत आहे ज्याला सिनेमॅटिक व्हिडिओ असे म्हटले जाते. गुर्मन यांच्या रिपोर्टमध्ये असेही म्हटले आहे की आगामी, आयफोन 13 प्रो आणि 13 प्रो मॅक्स प्रथमच ProRes व्हिडिओ स्वरूपात व्हिडिओ रेकॉर्ड करण्यास सक्षम असतील. हे फीचर्स प्रोफेशनल व्हिडीओज बनवणाऱ्यांसाठी उच्च दर्जाचे आऊटपुट देऊ शकतील. हे फीचर्स Apple ने एक दशकापूर्वीच विकसित केले होते आणि आता 8K रिझोल्यूशनला ते सपोर्ट करू शकते.

ProRes फीचर सध्या चित्रपट उद्योगात व्यावसायिक व्हिडिओ निर्मितीसाठी वापरले जाते. जास्त फाइल साईजमूळे ते इतर ठिकाणी वापरले जात नाही. गुर्मन यांच्यामते ProRes पुढील iPhones सीरीज मध्ये HD आणि 4K रिझोल्यूशन व्हिडीओ रेकॉर्ड करेल.

याव्यतिरिक्त, Apple फोटो फिल्टरच्या अधिक चांगल्या सुविधांची देखील योजना आखत आहे. यामुळे iPhone च्या वापरकर्त्यांना  “आर्टिफिशियल इंटेलिजसन्स” वापरून फोटोमधील पाहीजे असेल तेवढ्याच गोष्टीत बदल करता येईल. वापरकर्ते त्यांच्या फोटोंसाठी अनेक स्टाईल निवडू शकतील.

गुर्मन यांनी असेही नमूद केले की ,नवीन iPhone ए 15 बायोनिक चिपसेट वापरतील आणि एक लहान नाँच आणि डिस्प्ले टेक देतील ज्यामुळे 120Hz हून अधिक रिफ्रेश रेट मिळवणे शक्य होईल.

Comments are closed.