टाटा आणतेय Tigor EV, पाहा फिचर्स

Tata Motors launches Tigor EV

पेट्रोलचे वाढते भाव आणि एकूणच इंधनामुळे होणारे प्रदूषण ह्याला उपाय म्हणून मार्केट मध्ये इलेक्ट्रिक वाहनांचा बोलबाला सध्या सुरु आहेत. यातच आता टाटा कंपनीने देखिलगुंतवणुक करायच ठरवल आहे.

Tigor EV लाँच
टाटा मोटर्सने आपले दुसरे इलेक्ट्रिक वाहन, Tigor EV लाँच केले आहे, जे तीन प्रकारात उपलब्ध होणार आहे. Tigor EV XE ची किंमत ११.९९ लाख, Tigor EV XM ची किंमत १२.४९ लाख आणि Tigor EV XZ+ ची किंमत १२.९९ लाख आहे. Tigor EV XZ+ मध्ये ड्युअल टोनचा पर्याय आहे ज्याची किंमत १३.१४ लाख रुपये आहे.

५.७ सेकंदात ० ते ६० किमी प्रति तास
Tigor EV हे मॉडेल Ziptron ने प्रस्तुत केले आहे. यात ५५ kW चे पीक पॉवर आउटपुट आणि १७० Nm चे पीक टॉर्क आहे. ते ५.७ सेकंदात ० ते ६० किमी प्रतितास वेगाने जाते. Tigor EV हे २६KWH लिक्विड-कूल्ड, हाय एनर्जी डेंसिटी बॅटरी पॅक आणि IP ६७ रेटेड बॅटरी पॅकसह १,६०,००० KM बॅटरीद्वारे उपलब्ध आहे. तसेच कारची रेंज सुद्धा ३०६ किलोमीटर पर्यंत आहे.

वाहन चार्जिंग बद्दल
Tigor EV CCS2 चार्जिंग प्रोटोकॉलशी सुसंगत आहे याद्वारे फास्ट चार्ज करता येते, तसेच कोणत्याही १५A प्लग पॉईंटवरून चार्ज करता येईल. फास्ट चार्जिंग ०% पासून ८०% क्षमतेमध्ये सुमारे एका तासात जाते, तर होम चार्जिंगसाठी, यास अंदाजे ८.५ तास लागतात.

क्रॅश टेस्ट
ग्लोबल एनसीएपीने वाहनाला प्रौढाकरिता (१७.०० पैकी १२.०० गुण) आणि मुलांकरीता (४९.०० पैकी ३७.२४ गुण) तसेच संरक्षणासाठी ४ स्टार रेटिंग दिली आहे, असे कंपनीच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. वाहन, इलेक्ट्रिकली ॲडजस्टेबल आणि फोल्डेबल ORVM सह येते.ड्रायव्हर सीट, पुश बटण स्टार्टसह स्मार्ट की इत्यादी काही इतर वैशिष्ट्ये आहेत.

इलेक्ट्रिक युग
टाटा मोटर्सच्या पॅसेंजर व्हेईकल बिझनेस युनिटचे अध्यक्ष शैलेश चंद्रा म्हणाले की, ग्राहक आता “इलेक्ट्रिक वाहनांकडे आकर्षित होत आहेत”. टाटा मोटर्सने आजपर्यंत सुमारे ८,५०० इलेक्ट्रिक व्हेइकल युनिट्स विकल्या आहेत, त्यापैकी ६,५०० युनिट्स पहिले मॉडेल नेक्सन ईव्हीच्या होत्या.

Comments are closed.