कॉफी क्षेत्रातील ही कंपनी करतेय “बाऊन्स बॅक”

Coffee Day Enterprises Ltd (CDEL) said it has reduced debt "significantly" and the management is putting its best efforts to get back the company on track

कॉफी लॉजिस्टिक्स आणि हॉस्पिटॅलिटी मधील अग्रगण्य कंपनी
कॉफी डे एंटरप्रायजेस लिमिटेड मागील काही वर्षात पिछाडीवर गेल्याचे दिसत आहे, परंतु सध्या कंपनी पुन्हा एकदा मार्केटमध्ये आपले स्थान अबाधित करण्यासाठी प्रयत्न करत आहे.

कॉफी डे एंटरप्रायजेस लिमिटेड (सीडीईएल) ने सांगितले की कंपनीने आपल्यावरील कर्ज कमी केले आहे तसेच व्यवस्थापन कंपनीला ट्रॅकवर आणण्यासाठी सर्वोत्तम प्रयत्न करत आहे. ताज्या वार्षिक अहवालानुसार, ३१ मार्च २०२१ पर्यंत CDEL चे निव्वळ कर्ज १,७३१ कोटी रुपये होते.

कंपनीवर एकूण कर्ज १,७७९ कोटी रुपये होते ज्यात १,२६३ कोटी रुपयांचे दीर्घकालीन कर्ज आणि ५१६ कोटी रुपयांचे अल्प मुदतीचे कर्ज समाविष्ट आहे.

आर्थिक वर्षात २०२० मध्ये कंपनीचे निव्वळ कर्ज २,९०९.९५ कोटी रुपये होते.

याशिवाय सीडीईएलच्या सात उपकंपन्या कर्नाटक उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश न्यायमूर्ती के एल मंजुनाथ यांच्या अहवालाची वाट पाहत आहेत. जो ३,५३५ कोटी रुपयांच्या पुनर्प्राप्तीबाबत आहे.

“सात उपकंपन्यांच्या व्यवस्थापनाने न्यायमूर्ती केएल मंजुनाथ यांच्याकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर कंपनीच्या सहाय्यक कंपन्यांना ३,५३५ कोटी रुपये वसूल करण्याबाबत निर्णय घेण्याचा हक्क दिला आहे.”

कंपनीचे दैनंदिन कामकाज प्रमोटर आणि सर्व व्यावसायिकांच्या हितसंबंधांचे संरक्षण करण्यासाठी बोर्डाच्या मदतीने व्यावसायिक टीमद्वारे व्यवस्थापित केले जात आहे.

“कंपनीचे व्यवस्थापन कंपनीला पुन्हा रुळावर आणण्यासाठी सर्वोत्तम प्रयत्न करत आहे,” “मार्च २०२१ या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीपासून कर्जाची पातळी लक्षणीयरीत्या कमी झाली आहे.

व्हीजी सिद्धार्थ ऑगस्ट २०१९ च्या सुरुवातीला मृतावस्थेत आढळले, त्यानंतर कंपनीवर कर्जाची परतफेड करण्यासाठी दबाव आला होता. त्यानंतर नॉन-कोर मालमत्तांच्या विक्रीद्वारे कर्जाची भरपाई केली जात आहे.

यापूर्वी मार्च २०२० मध्ये, सीडीईएलने ब्लॅकस्टोन समूहासोबत तंत्रज्ञान व्यवसाय पार्क विकण्याचा करार केल्यानंतर १३ कर्जदारांना १,६४४ कोटी रुपये परत करण्याची घोषणा केली होती.

आर्थिक वर्ष २१ मध्ये, सीडीईएलची निव्वळ कमाई ८५३ कोटी रुपये होती, जी आर्थिक वर्ष २०२० मध्ये २,५२२ कोटी रुपये होती.

मार्च २०२१ ला संपलेल्या आर्थिक वर्षात महसूल ६६.१६ टक्क्यांनी कमी झाला. मुख्यतः कोविड -१९ आणि तसेच अध्यक्षांच्या निधनानंतर उद्भवलेल्या समस्यांमुळे समस्या निर्माण झाल्या, असे कंपनीने म्हटले आहे.

सीडीईएल ही कॉफी लॉजिस्टिक्स आणि हॉस्पिटॅलिटी सेक्टरमध्ये आहे. त्यांचा कॉफी व्यवसाय ज्यात लोकप्रिय कॅफे चेन ब्रँड कॅफे कॉफी डे (सीसीडी) समाविष्ट आहे, ज्याचा एकत्रित निव्वळ उत्पन्नात ४७ टक्के वाटा आहे. लॉजिस्टिक व्यवसायाचा महसूल ४५ टक्के आहे. सीसीडीकडे १६५ शहरांमध्ये ५७२ कॅफे आणि ३३३ सीसीडी व्हॅल्यू एक्सप्रेस कियोस्क आहेत.

Comments are closed.