“ह्या” पदक विजेत्यांना मिळणार इंडिगो कडून “हे” बक्षीस.

Indigo announces free tickets for one year to Paralympic Gold Medallists

काही दिवसापूर्वी झालेल्या टोकियो ऑलिम्पिक मध्ये भारतीय खेळाडूंनी उल्लेखनीय यश मिळवले होते आणि देशात पदक विजेत्यांना विविध पुरस्कार तसेच भरघोस बक्षिसे मिळाली.

सध्या टोकियो मध्ये पॅरालिम्पिक स्पर्धा चालू आहे ह्या स्पर्धेत देखील भारतीय खेळाडू उल्लेखनीय कामगिरी करताना दिसत आहेत. आणि त्यांच्यावर देखिल बक्षिसांचा वर्षाव होत आहे.

इंडिगोने मंगळवारी जाहीर केले की, ते टोकियो पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या अवनी लेखरा आणि सुमित अँटिल यांना एका वर्षासाठी अमर्यादित प्रवासासाठी मोफत तिकिटे देतील. अवनी लेखारा हीने टोकियो पॅरालिम्पिकमध्ये महिलांच्या १० मीटर एअर रायफल स्टँडिंग इव्हेंटमध्ये सुवर्णपदक जिंकले आहे, तर अँटिलने पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेत ६८.५५ मीटर भाला फेकून जागतिक विक्रमासह सुवर्णपदक जिंकले आहे.

कंपनीने निवेदनात म्हटले आहे की, १ सप्टेंबरपासून ते पुढील वर्षी ३१ ऑगस्टपर्यंत देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय दोन्ही मार्गांवर ह्या दोन खेळाडूंना प्रवासासाठी मोफत तिकिटे उपलब्ध असतील.

इंडिगो चे सीईओ रोनोजॉय दत्ता म्हणाले, “आम्हा सर्वांना अवनी आणि सुमित या दोघांचा अत्यंत अभिमान आहे. त्यांनी खेळात धैर्य आणि लवचिकता दाखवली आम्हाला माहित आहे की हे सोपे नव्हते. पण तुम्ही करुन दाखवले.

तुमचं यश देशासाठी अभिमानास्पद आहे आणि नम्रतेने आम्ही तुम्हाला एक वर्षासाठी इंडिगोवर विनामूल्य उड्डाणे ऑफर करू इच्छितो, ”असेही ते म्हणाले.

Comments are closed.