भारीच की! टाटा पॉवरला मिळाला तब्बल 945 कोटीचा प्रोजेक्ट

टाटा पॉवरने 120 MWh युटिलिटी स्केल बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टीमसह 100 MW चा EPC सोलर प्रोजेक्ट तयार करण्यासाठी सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (SECI) कडून प्रोजेक्ट मिळाल्याची घोषणा केली. 

टाटा पॉवरने 120 MWh युटिलिटी स्केल बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टीमसह 100 MW चा EPC सोलर प्रोजेक्ट तयार करण्यासाठी सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (SECI) कडून प्रोजेक्ट मिळाल्याची घोषणा केली.

प्रोजेक्टचे एकूण करार मूल्य अंदाजे 945 कोटी आहे आणि सदर प्रोजेक्ट 18 महिन्यांत पूर्ण केला जाईल, असे टाटा सन्सच्या उपकंपनीने बुधवारी एका निवेदनात म्हटले आहे.

करारानंतर, टाटा पॉवर सोलरची युटिलिटी स्केल EPC ऑर्डर बुक आता जवळपास 4.4 GW (DC) क्षमतेची आहे,ज्याचे अंदाजे मूल्य GST शिवाय 9,000 कोटी आहे.

SECI प्रोजेक्ट स्पॉट छत्तीसगढमध्ये आहेत, टाटा पॉवरने सांगितले की, ऑर्डरमध्ये इंजिनीअरिंग, डिझाइन, पुरवठा, बांधकाम, उभारणी, टेस्टिंग, O&M आणि प्रोजेक्ट सुरू करणे यांचा समावेश आहे.

टाटा पॉवरचे सीईओ आणि एमडी प्रवीर सिन्हा म्हणाले,”आम्हाला SECI कडून भारतातील सर्वात मोठ्या युटिलिटी स्केल BESS प्रोजेक्टसह सोलर EPC प्रोजेक्ट तयार करण्यासाठी ऑर्डर मिळाल्याने आनंद होत आहे.

टाटा पॉवर सोलरद्वारे कार्यान्वित केलेल्या पूर्वीच्या मोठ्या प्रोजेक्टमध्ये 80 MW NTPC जेतसर, 50 MW कासारगोड केरळ, 100 MW GIPCL राघनेस्डा, 100 MW TPREL राघाने यांचा समावेश आहे. लेह येथे 50 MWh बॅटरी स्टोरेजच्या BESS सह 50 MW चा आणखी एक सोलर प्रोजेक्ट कंपनीने सुरु केला आहे.

Comments are closed.