Tech Mahindra नफ्यात, Q2 मध्ये तब्बल ‘ इतका ‘ झाला नफा
Tech Mahindra Q2 profit rises 26%, declares special dividend of ₹15
सप्टेंबर तिमाहीत (Q2FY22) IT कंपनी टेक महिंद्राचा नेट प्रॉफिट 26% वाढून 1,338 कोटी झाला. जो गेल्या वर्षी याच कालावधीत 1,064 कोटी होता.
सेकन्शियल बेसवर,PAT पहिल्या तिमाहीत 1,353 कोटी वरून 1.1% कमी झाला आहे.
दरम्यान, ऑपरेशनमधून एकत्रित महसूल 16% नी वाढून, 10,881 कोटी झाला, जो गेल्या वर्षी ह्याच कालावधीच्या 9,371 कोटी होता.
ह्या तिमाहीत 1,473 मिलियन डॉलर महसूल मिळाला.
कंपनीने प्रति इक्विटी शेअर 15 रूपये इतका स्पेशल डीविदेंड जाहीर केला आहे.
या तिमाहीत टेक महिंद्राचा EBITDA 1,995 कोटींवर आला.
सप्टेंबर तिमाहीच्या अखेरीस कंपनीत एकूण 141,193 कर्मचारी होते.
या तिमाहीत अट्रिशनची पातळी 21% पर्यंत वाढली आहे, जी वर्षभरापूर्वीच्या 14% आणि मागील जूनच्या तिमाहीत 17% पेक्षा जास्त आहे.
निकालांच्या आधी, टेक महिंद्राचा स्टॉक NSE वर 1,531 वर बंद झाला.
Comments are closed.