टेगा इंडस्ट्रीजचा IPO येणार, जाणून घ्या कंपनीबाबत महत्वाच्या 10 गोष्टी

टेगा इंडस्ट्रीज आपला IPO आज म्हणजेच 1 डिसेंबरला घेऊन येत आहे. तर चला जाणून घेऊया IPO बाबत.

टेगा इंडस्ट्रीज आपला IPO आज म्हणजेच 1 डिसेंबरला घेऊन येत आहे. तर चला जाणून घेऊया IPO बाबत.

सबस्क्रिपशन घेण्यापूर्वी या 10 विशेष गोष्टी जाणून घ्या –

1) ही ऑफर 1 डिसेंबर 2021 रोजी सबस्क्रिप्शनसाठी उघडेल आणि ऑफरचे सबस्क्रिप्शन घेण्याची अंतिम तारीख 3 डिसेंबर 2021 निश्चित करण्यात आली आहे.

2) कंपनीने प्रति शेअर 443-453 रुपये किंमत बँड निश्चित केला आहे.

3) अपर प्राइस बँडवर 619.22 कोटी रुपये उभारण्याची कंपनीची योजना आहे. IPO ही 1,36,69,478 इक्विटी शेअर्सची ऑफर-फॉर-सेल (OFS) आहे. त्यामुळे कंपनीला ऑफरमधून कोणताही निधी मिळणार नाही.

4) IPO मध्ये गुंतवणूकदार किमान 33 इक्विटी शेअर्ससाठी आणि त्यानंतर 33 शेअर्सच्या पटीत बोली लावू शकतात. किरकोळ गुंतवणूकदार किमान 14,949 प्रति लॉटची गुंतवणूक करू शकतात आणि त्यांची कमाल गुंतवणूक 13 लॉटसाठी 1,94,337 रू.असेल.

5) कंपनी खनिज , खाणकाम आणि बल्क सॉलिड उद्योगात खाणकाम आणि खनिज प्रक्रिया, स्क्रीनिंग, ग्राइंडिंग यात सेवा पुरवते. गुजरातमधील दाहेज आणि पश्चिम बंगालमधील समली आणि कल्याणी तसेच चिली, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियामधील तीन प्रमुख खाण केंद्रे आहेत.

6) कंपनीचे मुख्य ग्राहक हे सोने आणि तांबे धातूच्या खनिज प्रक्रिया साइट्स आहेत, ज्याचा वाटा 34.92 टक्के आहे.

7) कंपनी तिच्या उत्पादन आणि सेवा पोर्टफोलिओकरिता MNCs सोबत स्पर्धा करते.

8) मेहुल मोहंका हे कंपनीच्या प्रमोटीपैकी एक आहेत, आणि कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. ते भारतीय उद्योग महासंघाच्या खाण आणि बांधकाम उपकरणे विभागाशी अध्यक्ष म्हणून संबंधित आहेत आणि CII च्या खाणकामावरील राष्ट्रीय समितीचे अध्यक्ष आहेत.

9) IPO Watch नुसार, IPO ग्रे मार्केटमध्ये प्रति शेअर 310 रुपये प्रीमियम कमवत आहे. 8 डिसेंबरपर्यंत शेअर वाटप निश्चित केले जाईल. अयशस्वी गुंतवणूकदारांना त्यांच्या बँक खात्यांमध्ये 9 डिसेंबरपर्यंत परतावा मिळेल, तर यशस्वी गुंतवणूकदारांना त्यांच्या डिमॅट खात्यांमध्ये 10 डिसेंबरपर्यंत शेअर्स मिळतील.

10) बीएसई आणि एनएसई वरील टेगा इंडस्ट्रीजच्या इक्विटी शेअर्सचे व्यवहार 13 डिसेंबरपासून सुरू होतील.

Comments are closed.