खैरात सुरूच! सेबीकडून ‘या’ IPO ना मिळाली मंजूरी

सेबीने आणखी 10 कंपन्यांच्या ड्राफ्ट पेपर्सना मंजुरी दिल्याने भारताच्या IPO मार्केटमध्ये मजबूत गती कायम राहण्याची अपेक्षा आहे.

सेबीने आणखी 10 कंपन्यांच्या ड्राफ्ट पेपर्सना मंजुरी दिल्याने भारताच्या IPO मार्केटमध्ये मजबूत गती कायम राहण्याची अपेक्षा आहे.

सदर 10 कंपन्यामध्ये Data Patterns India Ltd, Electronics Mart India Ltd, Gemini Edibles & Fats India Ltd, India1 Payments Ltd, Healthium Medtech Ltd, CE Info Systems Ltd, VLCC Health Care Ltd, AGS Transact Technologies Ltd, Metro Brands Ltd, आणि Godavari Biorefineries Ltd यांचा समावेश आहे.

संरक्षण आणि एरोस्पेस उद्योग क्षेत्रातील पुरवठादार Data Patterns India Ltd ला सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) कडून IPO साठी मंजूरी मिळाली आहे, ज्यात 300 कोटीचा फ्रेश इश्यू आणि प्रमोटीकडून 6.07 मिलियन शेअर्सची ऑफर फॉर सेल (OFS) असेल.

डेटा पॅटर्नला ब्लॅकस्टोनचे माजी प्रमुख मॅथ्यू सिरिएक यांनी फ्लोरिंट्री कॅपिटल पार्टनर्स LLP द्वारे पाठिंबा दिला आहे ज्यांच्याकडे कंपनीचा 12.8% स्टेक आहे.

MapmyIndia चा IPO, ज्याला CE Info Systems म्हणूनही ओळखले जाते, त्यात विद्यमान स्टेकहोल्डर आणि प्रमोटीचे 7.55 मिलियन शेअर्स OFS असतील.

Healthium Medtech Ltd च्या IPO मध्ये 390 कोटींचा फ्रेश इश्यू आणि विद्यमान स्टेकहोल्डर आणि प्रमोटीकडून 39.10 मिलियन शेअर्सचा OFS यांचा समावेश असेल.

गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला समर्थित मेट्रो ब्रँड्सच्या IPO मध्ये 250 कोटींचा फ्रेश इश्यू आणि 21.90 मिलियन शेअर्सचा OFS उपलब्ध आहे.

Gemini Edibles and Fats India च्या IPO मध्ये 2,500 कोटींची OFS आहे, तर इलेक्ट्रॉनिक्स मार्टने त्यांच्या IPO द्वारे 500 कोटी उभारण्याची योजना आखली आहे .

ब्युटी अँड वेलनेस फर्म VLCC हेल्थ केअर IPO मध्ये 300 कोटीचा फ्रेश इश्यू आणि 8.92 मिलियन पर्यंतचे OFS उपलब्ध करतील. वंदना लुथरा यांनी स्थापन केलेल्या, VLCC ने 2016 मध्ये त्यांचा IPO मागे घेतला होता.

AGS Transact Technologies हा IPO 800 कोटी पर्यंतचे OFS उपलब्ध करील. गोदावरी बायोरिफायनरीजच्या IPO मध्ये 370 कोटींचे फ्रेश इश्यू आणि 6.56 मिलियन शेअर्सचा OFS उपलब्ध आहे.

इंडिया 1 पेमेंट्सच्या IPO मध्ये 150 कोटींचा फ्रेश इश्यू आणि 10.31 मिलियन शेअर्सचा OFS उपलब्ध आहे.

Comments are closed.