फिक्स्ड डिपॉझिटवर फ्री लाईफ इन्श्युरन्स – काय आहे फंडा?
Few banks offer free life insurance policy if you open FD. But what are the terms and conditions?
काही बँका आपल्या ग्राहकांनी फिक्स्ड डिपॉझिट उघडल्यास त्यांना फ्री लाईफ इन्श्युरन्स देत आहेत अशा बातम्या गेल्या काही दिवसांत येत आहेत.ही नक्की काय भानगड आहे? हा लाईफ इन्श्युरन्स मिळवण्यासाठी काय अटी आहेत?
अशी स्कीम देणारी एक बँक म्हणजे डिसीबी बँक (डिसीबी बँक सुरक्षा एफडी). या बँकेने आदित्य बिर्ला सन लाईफ बरोबर टायअप केले आहे. डिसीबी बँकेच्या ज्या ग्राहकांचे वय १८ ते ५४ वर्षे आहे त्याच ग्राहकांना ही स्कीम लागू आहे. तुम्ही जेवढ्या रकमेची एफडी केली तेवढ्या रकमेचा लाईफ तुम्हाला मिळणार आहे. म्हणजे जर तुम्ही ५ लाखांची एफडी केलीत तर तुम्हाला ५ लाखांचे इन्श्युरन्स कव्हर मिळेल. मात्र ह्या इन्श्युरन्स कव्हरला ५० लाखांची मर्यादा आहे. म्हणजे तुम्ही ५० लाखांपेक्षा जास्त रकमेची एफडी केलीत तरी तुम्हाला ५० लाखांचेच इन्श्युरन्स कव्हर मिळणार आहे. बँकेकडून या एफडीवर ६.७५% इंटरेस्ट मिळणार आहे. या एफडीची मुदत तीन वर्षांची आहे.
आयसीआयसीआय बँकेकडूनदेखील अशी लाईफ इन्श्युरन्स पॉलिसी ग्राहकांना फ्रीमध्ये देण्यात येत आहे. यासाठी बँकेने आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाईफबरोबर टायअप केले आहे. बँकेच्या ग्राहकांनी जर ३ लाखांची एफडी केली तर बँकेकडून त्यांना ३ लाखांची लाईफ इन्श्युरन्स पॉलिसी दिली जात आहे. ही स्कीम ज्या ग्राहकांचे वय १८ ते ५० आहे त्यांच्याचसाठी लागू आहे. एफडीची मुदत २ वर्षे किंवा त्याहून जास्त असणे गरजेचे आहे.
ही एफडी करताना तुमचे जॉईंट अकाऊंट असले तरी जो प्रायमरी अकाऊंट होल्डर आहे त्यालाच या पॉलिसीचे कव्हर लागू असणार आहे. या दोन्ही बँकांमध्ये केलेली एफडी तुम्ही मुदत संपण्याआधीच मोडलीत ही लाईफ इन्श्युरन्स पॉलिसी रद्द होणार आहे असे दोन्ही बँकांनी स्पष्ट केले आहे.
Comments are closed.