रिलायन्सची गुंतवणूक असलेल्या या शेअरने २०२१ मध्ये ६५% रिटर्न दिलाय..आता वाटचाल कशी असेल?

This small cap share has given 65% returns in 2021

काही दिवसांपूर्वी आम्ही एचएफसीएल स्टॉकबद्दल ट्विट केले होते. भारत सरकारच्या मिनिस्ट्री ऑफ कम्युनिकेशन्सच्या टेलिकॉम डिपार्टमेंटने 5G टेक्नॉलॉजी आणि स्पेक्ट्रमच्या ट्रायल्सला मान्यता दिल्याचे हे वृत्त होते. याचा फायदा होणाऱ्या कंपन्यांमध्येएचएफसीएलचा समावेश आहे असे आम्ही म्हटले होते. यानंतर कंपनीने आपले निकाल जाहीर केले. या लेखातून कंपनीच्या आर्थिक परिस्थितीबद्दल आणि भविष्यातील वाटचालीच्या नियोजनाबद्दल माहिती देतो आहोत.

कंपनीचा अर्निंग्ज कॉल १२ मे २०२१ रोजी पार पडला. दिल्लीत रजिस्टर्ड ऑफिस असलेल्या या कंपनीचे OFC म्हणजेच ऑप्टिकल फायबर केबल्स आणि टेलिकॉम क्षेत्रातील इतर प्रॉडक्ट्स  बनवण्याचे कारखाने आहेत. गोवा, सोलन (हिमाचल प्रदेश), चेन्नई, होसूर आणि हैद्राबाद येथे २ अशा एकूण ६ कारखान्यांमध्ये कंपनी आपले प्रॉडक्ट्स बनवते. भारतीय टेलिकॉम क्षेत्रातील जवळपास प्रत्येक कंपनीएचएफसीएलची कस्टमर आहे. नावेच सांगायची झाली तर, जिओ, एअरटेल, व्होडाफोन, टाटा, बीएसएनएल, एल अँड टी, पॉवरग्रीड, गेल, रेलटेल, आयटीआय, भारत इलेक्ट्रिकल्स, इंडियन ऑइल अशी ही यादी आहे. याबरोबरच परदेशातील सौदी इलेक्ट्रिसिटी कंपनी, सौदी रेल्वेज, आफ्रिकेतील लिक्विड टेलिकॉम, ओमान ब्रॉडबँड सारख्या कंपन्या एचएफसीएलच्या कस्टमर आहेत. कंपनी आपले प्रॉडक्ट्स ३० हून अधिक देशांमध्ये निर्यात करते.

कंपनीला येणाऱ्या काळात काय संधी असू शकतात?

१.  भारत सरकारकडून 5G टेक्नॉलॉजीला मिळत असलेला पाठिंबा, डिजिटल इंडिया, भारत नेट, स्मार्ट सिटीज यासारखे उपक्रम
२. डिफेन्स सेक्टरचे सबंध देशातील टेलिकॉम नेटवर्क अपग्रेड करण्यासाठी जवळपास ५६० कोटींची गुंतवणूक करण्यात येणार आहे.
३. FTTH (फायबर टू द होम) – सध्या FTTH कनेक्शन्सची संख्या ४० लाख एवढी आहे. हीच संख्या २०२४ पर्यंत ५ कोटीपर्यंत जाईल असा अंदाज आहे.
४. जगभरातले अनेक देश आता चीनसोडून दुसरा पर्याय शोधू लागले आहेत. याचा कंपनीला फायदा होऊ शकतो.

टेलिकॉम सेक्टरसाठी कंपनीने वायफाय सिस्टिम्स, अनलायसन्सड बँड रेडिओज, इथरनेट स्विचेस यांच्यासारखे काही प्रॉडक्ट्स स्वतः डेव्हलप केले आहेत आणि त्याची विक्रीदेखील सुरु केली आहे. या सेक्टरमध्ये कंपनी खालील प्रोजेक्ट्सवर सध्या काम करते आहे.

१. रिलायन्स जिओ 4G आणि FTTH (भारतातील २०७ शहरांमध्ये कंपनीने FTTH नेटवर्क डिप्लॉय केले.)
२. भारत नेट – पंजाब (८००० किमी, ३२०० गावे), झारखंड (८००० किमी, १८०० गावे), महाराष्ट्र, तेलंगण, छत्तीसगढ यासारख्या राज्यांना कंपनी OFC सप्लाय करते आहे.

भारतात स्वतःची प्रॉडक्ट्स बनवत असल्याने कंपनीला सरकारच्या प्रॉडक्शन लिंक्ड इन्सेन्टिव्ह स्कीमचा फायदा घेता येऊ शकतो. याबरोबरच करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत वर्क फ्रॉम होम कल्चरचाही फायदा कंपनीला आपल्या प्रॉडक्ट्सच्या विक्रीसाठी होऊ शकतो.

कंपनी डिफेन्स सेक्टरसाठी इलेक्ट्रो ऑप्टिकल डिव्हाईस, इलेक्ट्रॉनिक फ्यूजेस,  राऊंटिंग नेटवर्क, रेडिओ नेटवर्क, फायबर मॉनिटरिंग सिस्टीम अशी विविध प्रकारची प्रॉडक्ट्स बनवते. सरकारकडून डिफेन्स क्षेत्रातील वाढती गुंतवणूक,डिफेन्स इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात होणारे बदल आणि अपग्रेडेशन, डिफेन्स प्रॉडक्ट्सची निर्यात कमी करण्याचे सरकारचे धोरण या सगळ्या बाबी कंपनीच्या पथ्यावर पडू शकतात.

रेल्वेज सेक्टरमध्ये कंपनीला टेलिकॉम इक्विपमेंट आणि सिग्नलिंग डिव्हायसेस या प्रॉडक्ट्समध्ये बिझनेसची संधी आहे. कंपनीला मार्च २०२१ मध्ये उत्तर प्रदेश मेट्रो रेल कार्पोरेशनकडून २२१ कोटींची ऑर्डर मिळाली आहे.

कंपनीच्या जमेच्या बाजू –
१. वायफाय सिस्टीम, FTTH चे भारतातील सर्वाधिक प्रॉडक्शन

२. OFC मार्केटमध्ये सर्वाधिक मार्केट शेअर

३. डिफेन्स आणि पब्लिक कम्युनिकेशन नेटवर्कमध्ये चांगली पोझिशन

४. ६ प्रॉडक्शन फॅसिलिटीज

कंपनीची आर्थिक कामगिरी – कंपनीला चौथ्या तिमाहीत ८६ कोटी ५० लाख रुपये नफा झाला आहे. हा नफा गेल्या वर्षीच्या याच तिमाहीतल्या नफ्यापेक्षा ८९४% जास्त आहे. २०२०-२१ या आर्थिक वर्षात कंपनीने २४६ कोटींचा नफा कमावला आहे जो गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत ३.८% ने जास्त आहे. कंपनीच्या नफ्यात २०१८ पासून दर वर्षाला ५ ते ६% वाढ होत आहे.

गेल्या वर्षीच्या सप्टेंबर क्वार्टरपासून कंपनीच्या प्रमोटर्सने आपला स्टेक ३८.६४% वरून मार्च २०२१ रोजी ४२.०५% पर्यंत वाढवला आहे.मार्च २०२० पासून कंपनीचे डायरेक्टर महेंद्र नहाटा, अनंत नहाटा आणि एम एन व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड यांनी सातत्याने ओपन मार्केटमधून शेअर्स विकत घेत आपला स्टेक वाढवत नेला आहे ही विशेष बाब आहे. याच काळात प्रमोटर्सने प्लेज केलेल्या शेअर्सची टक्केवारी जून २०२० मधील ५५. ४८% वरून मार्च २०२१ मध्ये ४४.७२% पर्यंत खाली आली आहे. सगळ्यात महत्वाचे म्हणजे रिलायन्स स्ट्रॅटेजिक बिझनेस व्हेंचर्स लिमिटेड या कंपनीचाएचएफसीएलमध्ये ३.७८% स्टेक आहे.

६ मे २०२१ रोजी आम्ही या कंपनीबद्दल ट्विट केले तेव्हा हा शेअर ३४ रुपये होता. आता हा शेअर ४३ रुपयांच्या आसपास आहे. दहा दिवसांत शेअरने २०-२२% रिटर्न दिला आहे. १७ मे २०२१ रोजी शेअरने आपला ५२ वीक हाय ४३.७५ नोंदवला. सध्या शेअरची किंमत ५, १०, २०, ५०, १०० आणि २०० डे मूव्हिंग ऍव्हरेजपेक्षा जास्त आहे. गेल्या काही दिवसांत कंपनीच्या शेअरमध्ये व्हॉल्युमही चांगला दिसून आला आहे आणि ऍक्युम्युलेशन होताना दिसते आहे.

 

कंपनीची गेल्या काही वर्षातील कामगिरी, वेगवेगळे प्रॉडक्ट्स डेव्हलप करण्याची कंपनीची क्षमता, सरकारच्या धोरणांना अनुसरून व्यावसायाची धोरणे आखणारे कंपनी व्यवस्थापन, मेक इन इंडियाला मिळणारा वाढता प्रतिसाद, येणाऱ्या काळात गरज बनणारी 5G टेक्नॉलॉजी आणि त्यासाठी लागणारी उत्पादने बनविण्याची कंपनीची क्षमता ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करता येणाऱ्या १-२ वर्षांसाठी हा शेअर चांगली कामगिरी करू शकतो.

Comments are closed.