‘अपना’ स्टार्टअप बनली भारतातील सर्वात फास्टेस्ट युनिकॉर्न, लवकरच करणार विस्तार
Two year old Apna is among the fastest unicorns of India
जॉब शोधणाऱ्यांसाठी रोजगार उपलब्ध करुन देणारी ‘अपना’ चे मूल्य 1.1 अब्ज डॉलर्स पर्यंत पोहचले आहे. टायगर ग्लोबल मॅनेजमेंटचे 100 मिलियन डॉलर्स यात समाविष्ट आहेत. युनिकॉर्न बनणारी ही सर्वात वेगवान भारतीय स्टार्टअप आहे.
ॲपलचे माजी एक्झिक्युटिव्ह निर्मत पारिख यांनी स्थापन केलेल्या, अपनाच्या प्लॅटफॉर्मवर 16 मिलियन युजर्स आणि 1.5 लाख रिक्रिटर्स आहेत. अपनाचे मूल्यांकन जूनमध्ये 500 मिलियन डॉलरपेक्षा दुप्पट झाले होते. कंपनीच्या गुंतवणूकदारांमध्ये सेक्वॉया इंडिया, लाइटस्पीड वेंचर पार्टनर्स, इनसाइट पार्टनर्स, आऊल वेंचर्स, मॅव्हरिक व्हेंचर्स आणि जीएसव्ही वेंचर्स यांचा समावेश आहे.
“आम्ही सर्वात मोठे स्किल-टेक व्यासपीठ तयार करणार आहोत. जगात 2.3 अब्ज लोक आहेत ज्यांना याची गरज आहे” पारिख यांनी सांगितले.
अपना कामगारांना एसी टेकपासून ते ग्राफिक डिझायनर ते वेल्डरपर्यंतच्या नोकऱ्यांमध्ये मदत करते. अपनाकडून हायरिंग करणाऱ्या कंपन्यांमध्ये बायजू, डेल्लीवेरी आणि बर्गर किंग यांचा समावेश आहे.
हे प्लॅटफॉर्म आतापर्यंत 28 भारतीय शहरांमध्ये उपलब्ध आहे. अपना जमा केलेल्या पैशांचा वापर संपूर्ण भारतात उपलब्धता वाढवण्यासाठी आणि अमेरिका, मध्य पूर्व, आफ्रिका आणि आग्नेय आशियात 2022 च्या सुरुवातीला शाखा सुरू करण्यासाठी करणार आहे, असे पारिख म्हणाले.
“आम्ही लिंक्डइनच्या रिव्हर्स आहोत. आम्ही नोकऱ्या देण्यास सुरुवात केली आहे आणि त्या वर एक कम्मुनिटी तयार करत आहोत. भारत हा असा देश आहे जिथे रिझल्ट महत्त्वाचा आहे, म्हणून आम्ही युजर्स ज्या समस्येमधून जात आहे त्या समस्येचे निराकरण करीत आहोत” ते म्हणाले.
जेव्हा एखादा उमेदवार अपना वर लिस्टिंग झालेल्या नोकरीसाठी अर्ज करतो, तेव्हा प्लॅटफॉर्म त्याला/तिला एका मूलभूत टेस्टद्वारे पात्र ठरवतो. जर एखादा उमेदवार मुलाखतीत अपयशी ठरला, तर अपना 24 तासात त्या व्यक्तीला अपस्कील करते आणि नंतर त्यांना नोकरीसाठी पुन्हा अर्ज करण्याची संधी देते.
अपनाकडे अद्याप कोणतेही उत्पन्न नाही, परंतु त्यानी भरती, कौशल्य आणि वितरणातून पैसे कमवण्याचा प्रयोग सुरू केला आहे. उदाहरणार्थ, जेव्हा एखादा विशिष्ट प्लायवुड ब्रँड सुतारांपर्यंत पोहोचू इच्छितो, किंवा स्कूटर ब्रँड डिलिव्हरी कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचू इच्छित असेल, तेव्हा अपना या कंपन्यांना कनेक्शन बनवण्यासाठी शुल्क आकारू शकते.
स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीचे पदवीधर पारीख म्हणतात की, “त्यांनी आपले काम सुरू करण्यापूर्वी या क्षेत्रातील आव्हाने समजून घेण्यासाठी इलेक्ट्रिशियन, फोरमॅन आणि कॅशियर म्हणून अल्प कालावधीसाठी काम केले. “उत्पादन तयार करणे म्हणजे संगीत बनवण्यासारखे आहे. जोपर्यंत तुम्ही भावनांमधून जात नाही आणि त्यांना जाणवत नाही तोपर्यंत तुम्ही चांगले संगीत बनवू शकत नाही”.
या करारामुळे अपना भारताची 27 वी युनिकॉर्न स्टार्टअप बनली आहे.
Comments are closed.