बुडत्याला काडीचा आधार! VIL साठी ‘ही’ गोष्ट फायद्याची,चर्चा सुरु
वोडाफोन-आयडिया कर्जमाफी, इक्विटी फंडिंग आणि कर्ज परतफेडीसाठी कर्जदार आणि गुंतवणूकदारांशी चर्चा करत आहे. मार्च 2022 च्या अखेरीस या चर्चेला पूर्णत्वास नेण्याची अपेक्षा आहे, असे कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक रविंदर टक्कर यांनी सांगितले.
वोडाफोन-आयडिया आपला व्यवसाय पुन्हा रुळावर आणण्यासाठी कंबर कसत आहे.कंपनी यासाठी विविध योजनांचा लाभ देखील घेत आहे.
वोडाफोन-आयडिया कर्जमाफी, इक्विटी फंडिंग आणि कर्ज परतफेडीसाठी कर्जदार आणि गुंतवणूकदारांशी चर्चा करत आहे. मार्च 2022 च्या अखेरीस या चर्चेला पूर्णत्वास नेण्याची अपेक्षा आहे, असे कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक रविंदर टक्कर यांनी सांगितले.
टक्कर म्हणाले की, सध्या जियोफोन नेक्स्ट आणि भारती एअरटेलची कॅशबॅक ऑफर यामुळे आम्हला तगडे आव्हान उभे राहीले आहे. आम्ही देखील स्मार्टफोन बाबत विचार करत आहोत. सदर योजनेत देखील आर्थिक सूट दिली जाईल.
त्यांनी दरवाढीच्या बाबत पुनरुच्चार केला आणि सांगितले की, व्होडाफोन आयडिया आपल्या प्रतिस्पर्थ्यांकडून दर वाढवण्याची वाट पाहणार नाही. जर 5G स्पेक्ट्रमचे मूळ दर कमी केले नाहीत, तर पुन्हा एकदा त्या एअरवेव्हसाठी कोणीही तयार होणार नाही.
टक्कर यांनी सोमवारी विश्लेषकांना सांगितले की, “आम्ही बँका आणि गुंतवणूकदारांशी चर्चा करत आहोत. गुंतवणूकीसाठी कर्ज आणि इक्विटी फंडिंग, तसेच या आर्थिक वर्षात मॅच्युअर होणाऱ्या बाँड्सच्या परतफेडीसाठी चर्चा करत आहोत.”
ते म्हणाले की, आम्हला सरकारचे मदत पॅकेज मिळाले आहे. कंपनीला चार वर्षांत 1 लाख कोटी सवलत मिळाली. तूर्तास कंपनीला विविध योजना अद्ययावत करण्याची आवश्यकता आहे.
केंद्र सरकारने सप्टेंबरमध्ये टेलिकॉम क्षेत्रासाठी अनेक मदत उपायांची घोषणा केली, ज्याचा सर्वात जास्त फायदा Vi ला झाला. कंपनीला AGR हप्ते खरेदी केलेल्या स्पेक्ट्रमसाठी भरण्याची आवश्यकता नाही.
Comments are closed.