वाह रे वाह! वारी एनर्जी आणतेय IPO, कागदपत्रे केली दाखल
IPO also has OFS component; proceeds from fresh issuance will be used for setting up 2 Gw solar cell unit and 1 Gw solar PV module plant.
सोलर एनर्जी कंपनी वारी एनर्जीने आपल्या IPO साठी कागदपत्रे दाखल केली आहेत. यामध्ये 1,350 कोटी रुपयांचा फ्रेश इश्यू आणि विक्रीची ऑफर उपलब्ध आहे.
40,07,500 इक्विटी शेअर्सच्या विक्रीच्या ऑफरमध्ये हितेश चिमणलाल दोशी, वीरेनकुमार चिमनलाल दोशी आणि महावीर थर्मोक्विप प्रायव्हेट लिमिटेड यांच्या 13,15,000 इक्विटी शेअर्सच्या विक्रीचा समावेश आहे. समीर शाह 40000 इक्विटी शेअर्स ऑफलोड करतील. निलेश गांधी 22,500 इक्विटी शेअर्स विकतील.
वारी एनर्जी ही वारी रिन्यूएबल टेक्नॉलॉजीजची प्रमोटर आहे, ज्यामध्ये ती 54.28 टक्के स्टेकहोल्डर आहे.
कंपनीने गुजरात येथिल देगाम गावात 2 गीगावॅट (GW) वार्षिक सोलर सेल उत्पादन सुविधा (910.3 कोटी रुपये) आणि 1 GW वार्षिक सोलर पीव्ही मॉड्यूल उत्पादन सुविधा (141.2 कोटी रुपये) उभारण्यासाठी फ्रेश इश्यू वापरला जाईल असे सांगीतले आहे.
प्री-आयपीओ प्लेसमेंटद्वारे वारी एनर्जीज 270 कोटी रुपयांचा फंड उभारण्याचा विचार करू शकते. प्री-आयपीओ प्लेसमेंट पूर्ण झाल्यास फ्रेश इश्यूचा आकार कमी केला जाईल.
कंपनी 2 GW ची क्षमता असलेल्या PV (फोटो-व्होल्टाइक) मॉड्यूल निर्मितीवर लक्ष केंद्रित करणारी भारतातील सोलर एनर्जी उद्योगातील प्रमुख प्लेअरपैकी एक आहे. कंपनी सध्या भारतातील चार कारखान्यांसह तीन ठिकाणी उत्पादन सुविधा चालवते.
कंपनी ईपीसी सर्व्हिस, प्रोजेक्ट डेव्हलपमेंट, रूफटॉप सोल्यूशन्स आणि सोलर वॉटर पंप ह्या क्षेत्रात देशात तसेच विदेशात सेवा पुरवते.
Comments are closed.